Friday, April 26, 2024

Latest Posts

आज समीर वानखेडे होणार का निलंबित?

आर्यन खान (Aryan Khan) प्रकरणामध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) मुंबईचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर अनेक आरोप लावण्यात आले आहेत.

आर्यन खान (Aryan Khan) प्रकरणामध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) मुंबईचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर अनेक आरोप लावण्यात आले आहेत. समीर वानखेडे यांची तब्बल ५ तास सीबीआयने चौकशी केली. समीर वानखेडे यांनी शाहरुखच्या मॅनेजरकडून २५ करोड रुपयांची मागणी केली असा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला होता परंतु काल पाच तासांच्या चौकशी नंतर समीर वानखेडेच्या वकिलांनी सांगितले की लावलेला आरोप हा खोटा आहे. या प्रकरणामध्ये समीर वानखेडे यांनी शाहरुख खानसोबतच्या चॅट न्यायालयामध्ये सादर केली. ही चॅट्स समीर वानखेडे यांनी उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या याचिकेसोबत जोडली होती.

परंतु आता एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सचिन वानखेडेंना खडसावले आहे आणि पूर्णपणे नियमांच्या विरोधात आहे असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. काल पाच तासाच्या चौकशी नंतर आज पुन्हा ११ वाजता समीर वानखेडे यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. सूत्रांनी असे सांगितले आहे की, कोणताही तपास अधिकारी आरोपीच्या कुटूंबीयांशी अवधी चॅटिंग कधी काय करू शकतात?आर्यन खान ड्रग प्रकरणाच्या तपासादरम्यान समीर वानखेडे यांनी शाहरुख खानसोबतच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅट्सबाबत आपल्या वरिष्ठांना कधीही माहिती दिली नाही.

Latest Posts

Don't Miss