Monday, May 20, 2024

Latest Posts

गणपती बापाच्या नैवेद्यासाठी बनवा शेंगदाण्याचे मोदक

गणरायाचे आगमन राज्यभरात आनंदात आणि उत्साहात झाले आहे. दहा दिवस बाप्पा घरोघरी विराजमान झाले आहते.

गणरायाचे आगमन राज्यभरात आनंदात आणि उत्साहात झाले आहे. दहा दिवस बाप्पा घरोघरी विराजमान झाले आहते. बाप्पाच्या येण्याने सगळीकडे एक वेगळाच उत्साह निर्माण झाला आहे. गणपतीची घरी स्थापना करून त्याची विधिवत पूजा केली जाते त्यानंतर बाप्पाला मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो. तसेच गणरायाच्या दर्शनासाठी अनेक पाहुणे मंडळी घरी येतात. गणपतीचे दहा दिवस बाप्पाला वेगवेगळ्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. त्यामध्ये आपण नेहमी उकडीचे मोदक किंवा रव्याचे मोदक हेच मोदकांचे प्रकार आपल्याला माहित आहेत. पण बाप्पाला तुम्हाला काही नवीन मोदकांचा प्रकार नैवेद्य म्हणून दाखवायचा असेल तर तुम्ही शेंगदाण्याचे पौष्टिक मोदक घरच्या घरी बाऊ शकता. चला तर पाहुयात शेंगदाण्याच्या मोदकाची रेसिपी

साहित्य:-

१ वाटी शेंगदाण्याचं पीठ
खोबर अर्धा वाटी
गूळ (चवीनुसार)
बेकिंग सोडा (आवश्यकतेनुसार)
वेलची पावडर (आवश्यकतेनुसार)
गुलाब पाणी (आवश्यकतेनुसार)

कृती:-

शेंगदाण्याचे मोदक बनवण्यासाठी सर्व प्रथम एका भांडयात शेंगदाण्याचे पीठ नीट चालून घ्यावे. पीठ चालून झाल्यानंतर त्यात बेकिंग सोडा, वेलची पावडर आणि गुलाब पाणी टाकून ते चांगलं मिक्स करून घ्या. मिक्स करून झाल्यानंतर त्यात खोबर टाकून पुन्हा मिक्स करून घ्या. एका बाजूला गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवा. त्यानंतर त्यात तूप टाकून गरम करण्यासाठी ठेवा. तूप गरम झाल्यानंतर त्यात खोबर नीट भाजून घ्या. भाजलेल्या खोबऱ्याचा चॅन सुगंध यायला लागला की ते एका भांड्यात काढून थंड होण्यासाठी ठेवून द्या. आता पुन्हा कढईत तूप, वेलची आणि गूळ घालून ते घट होईपर्यंत शिजवा. त्यानंतर गॅस बंद करून खोबरे घालून फीलिंग तयार करा. त्यानंतर ते मिश्रण थंड होण्यासाठी ठेवून द्या. त्यानंतर एका पुन्हा एका पॅनमध्ये पाणी, तूप आणि मीठ घालून घ्या. गॅस कमी करून त्यात हळूहळू शेंगदाण्याचे पीठ घाला. आणि चमचाने नीट मिक्स करून घ्या. नंतर त्याच्यावर झाकण ठेवून ४ ते ५ मिनिट वाफ काढून घ्या. ताटात काढून झाल्यानंतर ते चांगलं नीट मळून घ्या. त्यानंतर त्याचे छोटे गोळे करून ते तळहातावर फिरवून घ्या. नंतर बनवलले गोळे कपड्याने झाकून ठेवा. एक एक गोळे घ्या आणि मोदकाचा आकार द्या. नंतर स्टीमर पॅनच्या साहाय्याने १०- १५ मिनिटे मोदक वाफवून घ्या.

हे ही वाचा: 

टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार दिलासा…

केंद्र सरकारचे शेतकऱ्यांसाठी नवीन चार उपक्रम

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss