आंब्याच्या सिझनमध्ये घरच्या घरी बनवा आंबट-गोड आंब्याचे रायते

उन्हाळ्याचे दिवस चालू झाले आहेत.

आंब्याच्या सिझनमध्ये घरच्या घरी बनवा आंबट-गोड आंब्याचे रायते

उन्हाळ्याचे दिवस चालू झाले आहेत. सगळ्यांनाच आंबट-गोड खायला खूप आवडतं . आता आंब्याचा हंगाम चालू होत आहेत. आंब्यापासून खूप छान-छान पदार्थ आपण घरच्या घरी बनवु शकतो.अश्याच एका पदार्थ बदल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हा पदार्थ कोकणात पाहुणे आल्यानंतर केला जातो. हा पदार्थ लहानमुलानंपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातात.आंब्याचे रायते हे कलमाच्या, हापूस,तोतापुरी,इत्यादी आंब्यांपासून नव्हे तर रायवळ या आंब्यापासून बनवला जातो. रायवळ हा एक आंब्याचा एक प्रकार आहे. हा आंबा दिसायला हिरवा असला तरी तो आतून पिकलेला असतो. चला तर मग पाहुयात कसे बनवायचे आंब्याचे रायते.

साहित्य:- 

रायवळ आंबे,राई,मीठ,गुळ,तेल,हिंग,कडीपत्ता,लसुण,तिखट मसाला

कृती:- 

सर्वप्रथम रायवळ आंबे धुवून घ्या. आंबे १० ते १५ मिनिटे उकडण्यासाठी ठेवा. आंबे चांगले उकडून झाल्यावरती त्याची साले काढून घ्या .आंब्याचा रायता बनवण्यासाठी एक पातेलं गॅस वर ठेवा. त्या पातेल्यामध्ये तेल टाका. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये राई,कडीपत्ता, हिंग,लसुण यांची फोडणी द्या. नंतर त्यामध्ये उकडलेले रायवळ आंबे टाका. आंबे टाकल्यावरती त्यांना एकत्र मिक्स करून घ्या. नंतर त्यामध्ये तिखट मसाला आणि गुळ बारीक करून त्यामध्ये टाका. आपल्या आवडीनुसार गुळ कमी जास्त टाकू शकता. आंबे उकडले असल्यामुळे जास्त पाणी घालणायची गरज नाही. मात्र तुम्ही आवडीनुसार पाणी कमी जास्त करू शकता. नंतर त्यावर प्लेट ठेवून थोड उकळी काढून घ्या. तयार आहे गरम आणि आंबट-गोड असे आंब्याचे रायते.

हे ही वाचा:

कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट, कांद्यावरील निर्यातबंदी कायम

उद्धव ठाकरेंकडून अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीला लोकसभेचे तिकीट मिळण्याची शक्यता

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version