Sunday, April 28, 2024

Latest Posts

उद्धव ठाकरेंकडून अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीला लोकसभेचे तिकीट मिळण्याची शक्यता

लोकसभा निवडणुकींच्या राजकीय हालचालींना सध्या वेग आला आहे.

लोकसभा निवडणुकींच्या राजकीय हालचालींना सध्या वेग आला आहे. अजूनही महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. जिंकण्याची शक्यता असलेल्या आणि सक्षम उमेदवारांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यातच आता उद्धव ठाकरे मुंबईमध्ये मोठी राजकीय खेळी खेळण्याची शक्यता आहे. अभिषेक घोसाळकर(Abhishek Ghosalkar) यांच्या हत्येनंतर पत्नी तेजस्वी घोसाळकर (Tejaswi Ghosalkar) यांना लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वी शिवसेना गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची फेसबुक लाईव्ह दरम्यान गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आता अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. फेसबुक लाईव्ह चालू असतानाच अभिषेक घोसाळकर यांची हत्या करण्यात आली. त्यांची अचानक झालेल्या हत्येमुळे संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती. त्यांच्या हत्येनंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली होती. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था मोडकळीस आली आहे. वेंद्र फडणवीस यांनी आपल्या गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा,अशी मागणी त्यावेळी करण्यात आली होती. अभिषेक घोसाळकर हे ठाकरेंचे कट्टर समर्थक होते. ते शिवसेनेचे माजी नगरसेवक देखील होते. राजकीय दृष्ट्या अभिषेक घोसाळकर यांचा चांगला चांगला जनसंपर्क होता. उत्तर मुंबई हा भाजपचा मतदारसंघ आहे. मात्र आता याच मतदार संघात अभिषेक यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांना उद्धव ठाकरे यांच्याकडून तिकीट मिळण्याची शक्यता आहे.

अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर अनेक सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, गाडीखाली श्वान मेला तरी आता गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतील. असे विधान केल्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते. तेजस्वी घोसाळकर यांना उमेदवारी दिल्यानंतर भाजपाविरोधात प्रचार करता येऊ शकणार आहे. उद्धव ठाकरे तेजस्वी घोसाळकर यांना तिकीट देण्याचा विचार करत आहेत. जर त्यांनी तेजस्वी घोसाळकर यांना तिकीट दिले तर येथून कोण बाजी मारणार? हे पाहणं देखील महत्वाचे ठरणार आहे.

हे ही वाचा:

विजय शिवतारे अनंतराव थोपटे यांच्या भेटीनंतर घेणार ‘या’ मोठ्या नेत्याची भेट

मराठवाड्यात शिंदेंच्या शिवसेनेला एकच जागा मिळणार, संभाजीनगरची जागा भाजपाकडे जाण्याची शक्यता

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss