Friday, May 17, 2024

Latest Posts

राशी भविष्य, ३१ जानेवारी २०२३, तुमच्या उद्योग व्यवसायाला नवीन दिशा…

मेष : आज आपणास निद्रानाशाने शारीरिक कमजोरी जाणवेल. मौल्यवान वस्तूची चोरी होण्याची शक्यता आहे. समूह भोजनाचा आनंद लुटाल . अनेक लोक  तुमचे कौतुक करतील. निकटच्या सहकाºयांशी अनेक मतभेद झाल्याने दिवसाचा उत्तरार्ध तणावपूर्ण जाईल. तरुण मुली आणि प्रतिष्ठित महिलांचा सन्मान केला जाईल.

वृषभ : कर्ज मागणी केली असेल तर ती मागणी पूर्ण होईल. आज मिळालेला संदेश हा संपूर्ण कुटुंबासाठी आनंददायी असेल. दिवसाची सुरवात जरी थोडी थकणारी राहील . आजचा दिवस हा वैवाहिक जीवनातील वेगळा दिवस असेल.  तुम्हाला आज काहीतरी विचित्र वेगळा अनुभव अनुभवायला मिळेल. आज तुम्ही स्वप्नांच्या दुनियेत रमाल .

मिथुन: आज आपण इतरांच्या तुलनात्मक अधिक उत्तम कामगिरी करू शकाल. जनसामान्यात तुमच्याबद्दल आदरभावना निर्माण होईल.  अनेकजण शर्यतीत असताना देखील आपण सहजतेने यश पदरात पाडून घेण्यात यशस्वी व्हाल. धोरणात्मक महत्वाची कामे आजच निश्चित करा जेणेकरून योग्य वेळी ठोस  निर्णय घेण्यास मदतगार ठरेल.

कर्क : आजचा दिवस थोडा ओढाताणीचा आहे. आर्थिक व्यवहारात जुळवाजुळव करताना थोडी तारेवरची कसरत करावी लागण्याची शक्यता आहे. कर्जाऊ रक्कम न घेणे हिताचे ठरेल. दूरच्या नातेवाईकांकडून अप्रिय बातमी ऐकायला मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात अनबणी होऊ शकते. आपल्या बोलण्याने कोणी दुःखी होणार नाही याबाबत काळजी घ्यावी.

सिंह : आज आपणांस विविध आणि चवदार अन्नपदार्थ खाण्याविषयी रुची वाढेल. शेतकऱ्यांसाठी आज समाधानाचा दिवस आहे. आपणांस आपले पद टिकवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. तुम्ही आज घेतलेल्या निर्णयात काही त्रुटी राहू शकतात त्यामुळे कोणत्याही विषयाची शहानिशा केल्याशिवाय निर्णयाप्रत पोहोचू नये.

कन्या : आज आपण मिळालेल्या उत्पन्नाचा काही भाग धर्मकार्यात खर्च कराल. तुमच्या वाणीतून इतरांना आनंद होईल अशा वाक्प्रचाराचा उपयोग केला जाईल. चेहऱ्यावर प्रसन्न भाव उमटतील. आपणास मिळालेल्या पारिवारिक संस्काराचा उपयोग प्रत्यक्ष जीवनात अनुभवता येईल. आपण आज चतुष्पाद प्राण्याविषयी अत्यन्त भावुक व्हाल.

तुला : आपणांस आज दैवी उपासना करण्याची आवश्यकता आहे. विशेष करून हनुमान चालीसा पठण केल्याने मानसिक दुर्बलता कमी होण्यास मदत मिळेल. कोणत्याही प्रकारची आर्थिक गुंतवणूक करताना विश्वासार्हता पडताळूनच मगच निर्णय घ्यावा. परदेश गमनासाठी प्रयत्नशील असाल तर समोरून सकारात्मक प्रतिसाद मिळेल.

वृश्चिक : तुमच्या उद्योग व्यवसायाला नवीन दिशा देण्यासाठी करीत असलेल्या प्रयत्नांना यश प्राप्त होईल.आईच्या प्रकृतीची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. कौटुंबिक विषयामुळे थोड्याप्रमाणात मानसिक तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. औद्योगिकरण विषयात आमूलाग्र बदल करण्यात यशस्वी व्हाल. रोग प्रतिकारक शक्ती कमी होण्याची शक्यता आहे.

धनु : सर्वाशी सौजन्याने वागण्याची मनोवृत्ती तयार होईल. आज घडलेला गुरुशिष्य संवाद जीवन पथावर उपयुक्त ठरेल. शैक्षणिक क्षेत्रात अनमोल योगदान द्याल. यज्ञयाग अथवा धार्मिक कर्माच्या बाबतीत होणाऱ्या चर्चेमध्ये सहभागी व्हाल. संतती विषयक असणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी केलेली उपाय योजना लागू पडेल. प्रवासाचे बेत आखले जातील.

मकर : घरात नव्याने आलेल्या सदस्यामुळे आनंददायी वातावरण तयार होईल. कामे वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बेदरकारपणे वाहन चालवणे धोक्याचे ठरेल. वैवाहिक जीवनात कोणीतरी मिठाचा खडा टाकू शकतो. त्यामुळे आपण आपल्या लोकांबद्दलचा विश्वास टिकवून ठेवणे हिताचे ठरेल. आरोग्यविषयक काळजी घ्यावी.

कुंभ: सातत्याने सकारात्मक विचार करण्याची प्रवृत्ती उत्तम फलदायी ठरेल. तुम्हाला यश मिळेल. जर तुम्ही विद्यार्थी आहेत आणि परदेशात जाऊन शिक्षण इच्छा आहे तर तुम्हाला तुमच्या संकल्प पूर्तीचा आनंद प्राप्त होईल. घरातील आर्थिक स्थिती तुमच्या डोक्यावर भार असेल. सर्वसाधारणपणे लाभदायक दिवस राहील.

मीन : तुम्हाला दीर्घकालीन  प्रवासाची योजना फायदेशीर ठरेल. फिरते व्यापारी अथवा एजंट अशा व्यावसायिक मंडळींना आजचा दिवस फायद्याचा राहील. अतिशय व्यस्त असूनही तुम्ही आरोग्य चांगले राखल्यामुळे थकवा येणार नाही. सासरकडून धन लाभ होण्याची शक्यता आहे. नित्याच्या धावपळीतुन आज तुम्हाला स्वतःसाठी पर्याप्त वेळ मिळेल.

हे ही वाचा:

UNION BUDGET 2023, यंदाच्या अर्थसंकल्पातून नोकरदार वर्गाला काय मिळणार ?

UNION BUDGET 2023, भारताच्या इतिहासातील केंद्रीय अर्थसंकल्प सादर न करणारे मंत्री कोणते आहेत तुम्हाला माहित आहेत का ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss