Monday, April 29, 2024

Latest Posts

UNION BUDGET 2023, भारताच्या इतिहासातील केंद्रीय अर्थसंकल्प सादर न करणारे मंत्री कोणते आहेत तुम्हाला माहित आहेत का ?

यंदाचा अर्थसंकल्प १ फेब्रुवारी रोजी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारमन यांच्याद्वारे सादर होणार आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळातील हा अर्थसंकल्प असणार आहे. तसेच भारतातील सर्व लोक अर्थसंकल्पाची वाट पाहत आहे. अर्थ संकल्प हा केंद्रीय अर्थमंत्री यांच्याद्वारे सादर केला जाते हे आपल्याला माहित आहे.

यंदाचा अर्थसंकल्प १ फेब्रुवारी रोजी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारमन यांच्याद्वारे सादर होणार आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळातील हा अर्थसंकल्प असणार आहे. तसेच भारतातील सर्व लोक अर्थसंकल्पाची वाट पाहत आहे. अर्थ संकल्प हा केंद्रीय अर्थमंत्री यांच्याद्वारे सादर केला जाते हे आपल्याला माहित आहे. निर्मला सितारमन (Nirmala Sitharaman) या पाचव्यांदा लोकसभेत अर्थसंकल्प सादर करतील. याआधी मोरारजी देसाई ( Morarji Desai) यांनी १० वेळा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करून विक्रम केला होता. त्यांच्यानंतर पी चिदंबरम (P Chidambaram) यांनी ९ वेळा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. परंतु भारताच्या इतिहासात काही अशी नावे आहेत ज्यांनी अर्थसंकल्प सादर केला नाही. याची आपल्याला माहिती नसेल तर आपण जाणून घेऊयात.

हे ही वाचा: Union Budget 2023-24 Live Updates, यंदाच्या बजेटची प्रत्येक लाईव्ह अपडेट घ्या जाणून…

अर्थमंत्री असूनही ज्यांनी अर्थ संकल्प सादर केला नाही असे तीन अर्थमंत्री आहेत. त्यांचे नाव क्षितिज चंद्र नियोगी (Kshitij Chandra Niyogi), हेमवती नंदन बहुगुणा (Hemvati Nandan Bahuguna) आणि नारायण दत्त तिवारी (narayn Dutt Tiwari) आहे. अर्थसंकल्प सादर न करण्याचे प्रमुख कारण म्हणजे ते जास्त वेळ केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या पदावर राहता आले नाही. त्यामुळे कमी कालावधीत त्यांना अर्थसंकल्प मांडता आला नाही. किंवा काही वेळा तत्कालीन पंतप्रधानांनी अर्थसंकल्प सादर केला होता.

क्षितिज चंद्र नियोगी हे भारताचे दुसरे अर्थमंत्री होते. नियोगी यांनी आरके षण्मुखम चेट्टी यांची जागा घेतली होती. नियोगी यांनी ३५ दिवसांनीच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. अशा स्थितीत त्यांना अर्थसंकल्प मांडण्याची संधी मिळाली नाही.

हेमवती नंदन बहुगुणा १९७९ मध्ये इंदिरा गांधी यांच्या सत्तेखाली साडेपाच महिन्यांच्या कालावधीसाठी अर्थमंत्री झाले होते. अर्थसंकल्प सादर करण्यासाठी त्यांना अर्थमंत्री पदावर असताना खूप कमी वेळ मिळाला. त्यामुळे अर्थसंकल्प सादर न करताच त्यांनी पद सोडले. हेमवती नंदन बहुगुणा हे दोनदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते.

नारायण दत्त हे १९८७-८९ या कालावधीमध्ये अर्थमंत्री होते. नारायण दत्त अर्थमंत्री असताना राजीव गांधी पंतप्रधान होते. त्यावेळी मजी पंतप्रधान राजीव गांधी(Rajiv Gandhi) यांनी नारायण दत्त तिवारी यांच्या जागी अर्थसंकल्प सादर केला होता.त्यामुळे त्यांना अर्थसंकल्प सादर करता आला नाही. नारायण दत्त तिवारी हे त्याकाळचे दिग्गज नेते मानले जायचे.

हे ही वाचा:

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आनंद आश्रमात दाखल

क्रिकेट जगतातील महत्त्वाची बातमी, न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० आधी या भारतीय सलामवीराने क्रिकेटमधून घेतली निवृत्ती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss