Monday, May 6, 2024

Latest Posts

आजचे राशिभविष्य,७ नोव्हेंबर २०२३; तुमच्यापैकी काही जण…

आजचे राशिभविष्य,७ नोव्हेंबर २०२३; तुमच्यापैकी काही जण...

मेष राशी-

तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यास लाभदायक दिवस. आज तुम्हाला कुणी अज्ञात स्रोताने पैसा प्राप्त होऊ शकतो ज्यामुळे तुमच्या बऱ्याच आर्थिक समस्या दूर होतील. मित्र आणि कुटुंबातील सदस्य आपणास साहाय्य आणि प्रेम देतील.

वृषभ राशी-

तुमच्यापैकी काही जण बºयाच कालावधीपासून कामकाजासाठी खूप अतिरिक्त वेळ देत आहात आणि त्यामुळे तुमची ऊर्जा कमी झाली आहे – आज सगळ्या तणाव व द्विधा मन:स्थितीचा आजचा शेवटचा दिवस असावा असे तुम्हाला वाटेल.

मिथुन राशी-

अत्यंत व्यस्त वेळापत्रकातदेखील आपले आरोग्य चांगले असेल. आज तुम्हाला चांगल्यापैकी पैसा मिळणार आहे – परंतु खर्चात वाढ झाल्याने बचत करणे दुरापास्त ठरेल. घरातील कुणी सदस्याच्या व्यवहाराने तुम्ही चिंतीत राहू शकतात.

कर्क राशी-

अत्यंत व्यस्त दिवस असला तरी आरोग्य चांगले राहील. तुम्ही आज तुमचे पत्ते व्यवस्थित टाकलेत तर अतिरिक्त रोख रक्कम कमावू शकाल. कुटुंबातील एखाद्या स्त्रीचे आरोग्य काळजी करण्याजोगे होईल.

सिंह राशी-

आज तुम्ही एकदम शांततेत राहाल आणि मौजमजा करण्याचा तुमचा मूड बनेल. अनपेक्षित बिलांमुळे आर्थिक बोजा वाढेल. कुणीतरी तुम्हाला त्रास देण्यास कारणीभूत ठरेल – तुमच्या विरोधात काही शक्ती कार्यरत झाल्या आहेत.

कन्या राशी-

नेहमीपेक्षा आज तुमची ऊर्जा कमी आहे असे तुम्हाला जाणवेल – म्हणून अतिरिक्त कामाचा बोजा घेऊ नका – थोडी विश्रांती घ्या आणि आजच्या भेटीगाठींच्या वेळा पुढे ढकला.

तुला राशी-

आरामात राहण्याचा आनंद आज लुटू शकाल. नव्या आर्थिक करारांना अंतिम स्वरुप मिळाल्यामुळे ताजा अर्थपुरवठा होईल. तुमची अतिरिक्त ऊर्जा आणि प्रचंड उत्साह तुम्हाला सुयोग्य ठरतील असे निर्णय मिळतील आणि घरगुती तणाव सुकर करील.

वृश्चिक राशी-

इतरांबरोबर आनंद वाटून घेण्याने आपले आरोग्य बहरून जाईल. धनाची देवाण-घेवाण आज दिवसभर असेल आणि दिवस मावळण्याची वेळी तुम्ही बचत करण्यात यशस्वी असाल. नातेसंबंध नव्याने दृढ करण्याचा दिवस.

धनु राशी-

हृदयरोग असणाºयांनी कॉफी सोडण्याची तातडीची गरज आहे. यापुढेही असेच कॉफी घेत राहिलात तर आपल्या हृदयावर अनावश्यक दडपण येईल. आज कुणी विपरीत लिंगीच्या मदतीने तुम्हाला व्यवसायात किंवा नोकरीमध्ये आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

मकर राशी-

चांगल्या गोष्टी घेण्यासाठी तुमचे मन सज्ज राहील. घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. पाहुण्यांचा सहवास आनंददायी असणारा दिवस. आपल्या नातेवाईकांसाठी काहीतरी खास योजना आखा, ते नक्कीच तुमचे कौतुक करतील.

कुंभ राशी-

मान अथवा पाठीच्या निरंतर वेदनांचा तुम्हा त्रास होण्याची शक्यता आहे. विशेषत: सर्वसामान्य अशक्तपणाबरोबर जर हा त्रास होत असेल तर दुर्लक्ष करू नका. आजच्या दिवशी विश्रांती अत्यंत गरजेची आहे.

मीन राशी-

आजच्या विशेष दिवशी तुमच्या तंदुरुस्तीमुळे तुम्ही एखादे असामान्य काम कराल. दिवसाच्या उर्वरित काळात पैशांची स्थिती सुधारेल.

Latest Posts

Don't Miss