Thursday, May 16, 2024

Latest Posts

Satara Loksabha Constituency चा तिढा सुटला, Udayanraje Bhosale यांना BJP कडून उमेदवारी जाहीर

सातारच्या जागेचा तिढा सुटला असून भाजपच्या उदयनराजे भोसले यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्याविरुद्ध उदयनराजे भोसले निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर देशभरात रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. मात्र अजुनहि महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) मधील पक्षांमध्ये जागावाटपावरून बरेच वाद आहेत. अश्यातच सातारा लोकसभा मतदारसंघातून (Satara Loksabha Constituency) निवडणूक लढवण्यासाठी महायुतीमधील भाजप (BJP)आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) यांनी जोर लावला होता. आता सातारच्या जागेचा तिढा सुटला असून भाजपच्या उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्याविरुद्ध उदयनराजे भोसले निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. भाजपच्या केंद्रीय कमिटीकडून प्रेसनोट जाहीर करण्यात आली ज्यात उदयनराजे भोसले यांना सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघावरून महायुतीमधील घटकपक्ष असलेले भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यात बरेच वाद निर्माण झाले होते. या जागेवर दोन्ही पक्षांनी आपला हक्क सांगितला होता. राष्ट्रवादीने जरी या जागेवर दावा केला असला तरीही उदयनराजे भोसले यांना भाजपकडून उमेदवारी देण्याचे स्पष्ट संकेत देण्यात आले होते. त्यामुळे उदयनराजे भोसले यांनी प्रचारालाही सुरुवात केली होती. तसेच, उदयनराजे भोसले यांनी काही दिवसांपूर्वी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेटही घेतली होती. त्यामुळे, त्यांची उमेदवारी निश्चित झाल्याच्या चर्चा होत होत्या. परंतु आज अधिकृतपणे महायुतीकडून उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

आता साताऱ्यातून महविकास आघाडीचे शशिकांत शिंदे विरुद्ध महायुतीचे उदयनराजे भोसले अशी थेट लढत होणार आहे. उदयनराजे भोसले यांनी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच साताऱ्यात जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. येत्या दोन दिवसांमध्ये उदयनराजे भोसले हे उमेदवारीचा अर्ज भरणार असल्याची माहिती समोर येत आहे. आता, सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवार जरी निश्चित झाले असले तरी सातारकर कोणाला निवडून देतात हे काही दिवसांत स्पष्ट होईल.

हे ही वाचा:

देशाला PM Modi यांच्यासारख्या खमक्या नेतृत्वाची गरज – Ajit Pawar

Sangali मध्ये MVA मध्ये बंडखोरी, Vishal Patil यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss