Saturday, May 4, 2024

Latest Posts

शालेय शिक्षण विभागातून ४७ लाख गेले चोरीला, मंत्रालयातील महिन्याभरातला दुसरा प्रकार

मंत्रालयातून एक धक्कादायक बातमी आली असून शालेय शिक्षण विभागातून तब्बल ४७ लाख ६० हजार रुपयांची चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. देशभरात निवडणुकीची धामधूम सुरु असतानाच दुसरीकडे हा प्रकार समोर आला आहे.

मंत्रालयातून (Mantralay) एक धक्कादायक बातमी आली असून शालेय शिक्षण विभागातून (Department of School Education, Maharashtra) तब्बल ४७ लाख ६० हजार रुपयांची चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. देशभरात निवडणुकीची (Loksabha Election 2024) धामधूम सुरु असतानाच दुसरीकडे हा प्रकार समोर आला आहे. आरोपींनी शालेय शिक्षण विभागातून बनावट चेक, बनावट स्टॅम्प, आणि स्वाक्षरीद्वारे चार टप्प्यात ४७ लाख ६० हजार रुपये काढल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई मंत्रालयातील हि गेल्या महिन्यभारातील दुसरी घटना असून याआधी पर्यटन विभागातून (Department of Tourism, Maharashtra) ६७ लाख रुपये गायब झाले होते.

शालेय शिक्षण विभागातून बनावट स्टॅम्प, बनावट चेक आणि स्वाक्षरीद्वारे एकूण चार टप्प्यात ४७ लाख ६० हजार काढल्याची बातमी समोर आली आहे. याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात चार जणांवर कलाम ४१९, ४२०, ४६५, ४६७, ४७१, ४७३, ३४ भादंवि अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. शालेय शिक्षण विभागाच्या खात्यातून काढण्यात आलेले पैसे नमिता बाग, प्रमोद सिंग, तप कुमार आणि झितन खातून यांच्या खात्यावर हि रक्कम जमा करण्यात आल्याचे तपासातून समोर आले आहे. याबाबत पोलीस अधिक चौकशी करत असून यामागचा मास्टरमाइंड कोण? याचा शोध पोलीस घेत आहेत.

याअगोदरही पर्यटन विभागाच्या खात्यातून पैसे चोरीला गेल्याची घटना समोर अली होती. महिन्याभरातील हि दुसरी घटना असून पर्यटन विभागाच्या खात्यातून ६७ लाख चोरीला गेले होते. याचा तपास मरीन लाईन्स पोलीस करत आहेत. पोलिसांनी केलेल्या तपासातून चोरीला गेलेली रक्कम ज्या बँक खात्यात जमा झालेली आहे ती सर्व खाती कोलकाता शहरातील आहेत. महिनाभरात हि दुसरी घटना असून मंत्रालयातील कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. निवडणुकीच्या धामधुमीत शासनाचे लक्ष विभागांकडे आहे कि नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे.

हे ही वाचा:

Voting करण्यासाठी ‘या’ दिवसापर्यंत Registration करता येणार

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदारांना सोयीसुविधा पुरवा – Nana Patole

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss