Jayant Patil यांची आज ED चौकशी, मुंबई कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांना आज दिनांक २२ मे २०२३ रोजी मुंबईतील ईडी कार्यालयात सकाळी ठीक ११ वाजता चौकशीसाठी हजर राहणार सांगितले आहे.

Jayant Patil यांची आज ED चौकशी, मुंबई कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांना आज दिनांक २२ मे २०२३ रोजी मुंबईतील ईडी कार्यालयात सकाळी ठीक ११ वाजता चौकशीसाठी हजर राहणार सांगितले आहे. इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस (आयएल अॅण्ड एफएस) गैरव्यवहार प्रकरणी जयंत पाटील यांना समन्स बजावण्यात आले होते. या सर्व पार्श्वभूमीवर जयंत पाटील हे ईडी कार्यालयात हजर होण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमीका घेतली आहे. जयंत पाटील यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादीच्या मुंबई कार्यालयाबाहेर आक्रमक भूमीका घेतली आहे.

आज जयंत पाटील याना ईडी कार्यलयात उपस्थित राहण्यास सांगितले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जयंत पाटील हे ईडी कार्यालयात हजर होण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमीका घेतली आहे. तर ईडी कार्यालयाच्या चारही बाजूच्या रस्त्यांवर पोलिसांकडून बॅरीकेटिंग करण्यात आलं आहे. तसेच राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर जयंत पाटलांच्या नावाने घोषणाबाजी करायला सुरुवात केली आहे. तर सांगलीहून काही कार्यकर्ते मुंबईत आले असून काही कार्यकर्ते सांगली येथेच ईडी आणि भाजपाविरोधात तीव्र आंदोलन छेडणार आहेत.

तसेच जयंत पाटील राज्याचे माजी गृह आणि माजी अर्थमंत्री आहेत. तसेच ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. तब्बल ७ वेळा जयंत पाटील आमदार म्हणून निवडून आले आहेत. तसेच इस्लामपूरचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर ईडी आणि भाजापाविरोधात आंदोलन पुकारले आहे. जयंत पाटलांच्या नावाने घोषणाबाजी करण्यात येत असून जयंत पाटलांच्या मुंबईतील घराबाहेर बॅनरबाजीही करण्यात आली आहे. जयंत पाटील यांना ईडीने आयएल आणि एफएलएस प्रकरणी चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. आयएल आणि एफएलएसच्या माध्यमातून मोठा आर्थि गैरव्यवहार केला गेला असल्याचा जयंत पाटील यांच्यावर आरोप आहे. या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात जयंत पाटील यांना ही नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती आहे.

हे ही वाचा:

IPL2023, कोणता संघ प्लेऑफचे चौथे स्थान मिळणार?

Aluminium Foil Paper वापरणे टाळा, उद्भवू शकतो आरोग्यावर मोठा परिणाम!

वर्षा निवासस्थानी जाऊन भगतसिंह कोश्यारींनी घेतली एकनाथ शिंदेची भेट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version