Saturday, May 4, 2024

Latest Posts

मुंबईतील भाजप कार्यालयाला शॉट सर्किट होऊन आग

नुकतीच भाजपच्या मुंबई कार्यालयास आग लागल्याची घटना समोर आली. मुंबईतील नरिमन पॉईंट जवळ असणाऱ्या भाजपच्या कार्यालयास आग लागली. किचन चे वेल्डिंग चालू असताना ही आग लागल्याचे समोर येत आहे. शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागली होती परंतु आता तिथे अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. कार्यालयात महत्वाची कागदपत्रे आणि साहित्य असल्याने तेही जळाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भाजपच्या मुंबई कार्यालयास आग लागल्याची घटना समोर आली आहे. मुंबईतील नरिमन पॉईंट जवळ असणाऱ्या भाजपच्या कार्यालयास आग लागली. किचनचे वेल्डिंग चालू असताना ही आग लागल्याचे समोर येत आहे. शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागली होती, परंतु आता तिथे अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. कार्यालयात महत्त्वाची कागदपत्रे आणि साहित्य असल्याने तेही जळाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

रविवार असल्याने कार्यालयात वेल्डिंगचे काम चालू होते. शॉर्ट सर्किट झाल्याने कार्यालयाच्या मागच्या बाजूस आग लागली. प्रचंड धूराचे लोट बाहेर येत होते. कार्यालयात कोणीही नसल्याने मानहानी टळलेली आहे. नरिमन पॉईंट जवळ असणारे हे कार्यालय प्रमुख कार्यालय असून पक्षाशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे व साहित्य तेथे होते. पण त्यांचे किती नुकसान झाले हे अजून समोर आलेले नाही. या कार्यालयाच्या जवळच मंत्रालयाचा परिसर आहे, शिवाय कार्यालयाशेजारी मोठा हॉल देखील आहे. अग्निशमन दलाला बोलावून आगीवर नियंत्रण करण्याचे प्रयत्न चालू आहेत. भाजपचे मुंबईतील हे प्रमुख कार्यालय असल्याने मोठे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची तेथे नेहमीच वर्दळ असते. परंतु, आज रविवार असल्याने कार्यालयात कोणीही नव्हतं अशी माहिती मिळाली.

कार्यालयास आग लागल्यानंतर भाजपचे मंत्री प्रवीण दरेकर यांनी सांगितले की ‘आगीची माहिती मिळताच काही प्रमुख नेते घटनास्थळी पोहोचत आहेत. कार्यालयात निवडणुकी संबंधित कागदपत्रे व साहित्य होते ज्याची तपासणी सध्या चालू आहे. आगीचे नेमके कारणही तपासले जाईल. निवडणुकीच्या काळात ही गंभीर घटना घडल्याने त्याची दखल देखील घेतली जाईल. आगीमध्ये कोणाचीही हानी झालेली नसून काही प्रमाणात आग ही नियंत्रणात आली आहे.

हे ही वाचा:

अभिषेक शर्माने उडवला दिल्लीच्या बॉलर्सचा धुव्वा

उद्धव ठाकरेंचा Amit Shah आणि PM Modi यांच्यावर हल्लाबोल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss