Friday, May 17, 2024

Latest Posts

पुण्यातील १९ वर्षीय तरुणाचा सेक्सटॉर्श मुळे बळी : बदनामीच्या भीतीने केली आत्महत्या

आतापर्यंत पुण्यातुन गुन्हेगारी वाढल्याचे वृत्त येत होत पण परप्रांतीय गुन्हेगारांकडून सुद्धा पुण्यातील लोकांना लक्ष्य केला जात आहे.पण पुणे पोलिसांच्या शौर्य आणि उत्तम कामगिरीमुळे आरोपी पोलिसांच्या अटकेत आहे .काही दिवसांपूर्वीच पुण्यातील एका १९ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली होती. पोलिसांनी चौकशी केल्यास असे लक्षात आले की हा तरुण सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकला होता. आणि समाजात स्वतःची आणि घरच्यांची बदनामी होऊ नये म्हणून मुलाने आत्महत्या केली असल्याची माहिती आहे. मुख्य म्हणजे या संपूर्ण प्रकरणातील मास्टरमाईंड आरोपी हा राजस्थानात वास्तव्य करत होता, जेव्हा पोलीस आरोपीला पकडायला गेले तेव्हा पुणे पोलिसांवर राजस्थानमध्ये दगडफेक करण्यात आली आहे तरीही पुणे पोलिसांनी सेक्सटॉर्शनमार्फत खंडणी उकळणाऱ्या मास्टरमाईंड आरोपीला पुण्यातील दत्तवाडी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार आत्महत्या केलेला १९ वर्षीय हा मुलगा इन्स्टाग्राम आयडीवरुन एका अनोळखी प्रीत यादव नावाच्या एका मुलीच्या आयडीशी चॅटिंग करत होता. त्यावेळी प्रीत यादव नावाच्या या मुलीच्या आयडीवरुन मुलाचे अर्ध नग्न फोटो पाठवण्यास सांगितले होते. आणि मुलाने त्याचे फोटो या अनोळखी आयडीवर पाठवले होते. काही दिवसानंतर या प्रीत यादवने हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याच्याकडून ४ हजार ५० रुपयांची मागणी केली फोन पे वरुनहे पैसे पाठवण्यास सांगितले. मुलाने घाबरून प्रीती यादव या मुलीला पैसे पाठवले. त्यानंतर प्रीती यादव या आयडीवरून वारंवार पैशाची मागणी करण्यात आली होती. नंतर प्रीती यादवच्या आयडीवरून अलीकडेच प्रीत यादव नावाच्या अकाउंटवरुन तरुणाच्या भावाला तरुणाचा अर्धनग्न फोटो पाठवला होता. त्यानंतर लगेच तरुणाच्या भावाने तो फोटो डिलीट केला होता. हा फोटो एका व्हिडीओचा स्क्रीनशॉट होता. हे तरुणाच्या भावाला लक्षात आले फोटो पाहून तरुणाचा भाऊ हादरला होता. शिवाय यासंदर्भात संबंधित तरुणाने त्याच्या मैत्रिणीलाही माहिती दिली होती. वारंवार धमकी आल्याने अखेर या मुलाने घरच्यांच्या आणि स्वतःची बदनामी होऊ नये म्हणून टोकाचं पाऊल उचललं. घराच्या इमारतीवरुन खाली उडी मारुन १९ वर्षीय मुलानेे आत्महत्या केली.

माहिती मिळातच पुण्यातील दत्तवाडी पोलीसांनी चौकशी सुरु केली या प्रकरणातील आरोपी राजस्थानमध्ये असल्याची माहिती मिळताच पुण्यातील दत्तवाडी पोलीस राजस्थानातील लक्ष्मणगढ तालुक्यात पोहचले. यावेळी त्याच्या गावातील पोलिसांनी आणि त्याच्या घरच्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. पोलिसांनी जीवाची पर्वा न करता आरोपीचा अडीच किलोमीटर पाठलाग केला आणि आरोपीला अटक केली.

राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्या विरोधात फौजदारी जनहित याचिका दाखल

Latest Posts

Don't Miss