Friday, May 17, 2024

Latest Posts

पुण्यातील महिला सुरक्षित आहेत का ?; भर दुपारी तरुणीची गळा आवळून हत्या

दिवसेंदिवस पुण्यात घडणाऱ्या गुन्ह्यांची संख्या वाढतच चालली आहे , आता पुण्यात दिवसाढवल्या खुनाचे गुन्हे घडताना आढळून येत आहेत. पुण्यातील एका २८ वर्षीय तरुणीची भर दुपारी एका अज्ञात व्यक्तीने हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हि घटना दुपारी ३ वाजता घडली आहे. हा गुन्हा कोणी केला आहे आणि गुन्हा करण्यामागचं कारण काय हे अजून कळलेलं नाही. याप्रकरणी पुण्यातील खेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सध्या पोलीसांचा तपस सुरु आहे. तसेच यामुळे शहरात दहशदीच वातावरण आहे आणि मुलींच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.

पुण्यातील गुन्ह्यांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच पोलिसांना मारहाण केल्याची घटना समोर आली होती , नंतर थेट पोलिसांवर गोळीबार झाल्याची घटना देखील समोर आली होती , त्यामुळे पुण्यात गेल्या काही दिवसांपासूनच दहशदीच वातावरण तयार झालं आहे. आता सरळ दिवसाढवळ्या एका २८ वर्षीय तरुणीच्या हत्येची घटना समोर आली आहे . मिळालेल्या माहितीनुसार मृत तरुणीचे नाव कोमल गणेश केदारी असे आहे. कोमलच्या वडीलांनी या प्रकरणी तक्रार पोलिसांना केली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी दुपारी कोमल घरात बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्या रुग्णालयात व्हेंटिलेटर नसल्याने तिला चांंडोली गावातील रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र त्यानंतर चांंडोली गावातील डॉक्टरांनी कोमलच्या कुटुंबियांना चाकणच्या रुग्णालया घेऊन जाण्याचा सल्ला दिला. चाकणच्या रुग्णालयात तापसणी झाल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. तिचे पोस्टमार्टम करण्यात आलं. यात तिचा मृत्यू गळा आवळून मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं. या घटनेमुळे दिवसाढवळ्या खून झाला आहे हे समजताच शहरात दहशदीच वातावरण तयार झालं आहे .

अलीकडेच पुण्यातील पोलिस एका संशयित दरोडेखोराच्या मागावर होते. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार तो दरोडेखोर घरात रात्री दरोडा घालणार होता पोलिसांचं एक विशेष पथक दरोडेखोराला पकडण्यासाठी पाठवण्यात आलं होत. दरोडेखोर त्याच्या साथीदारांसह ठरलेल्या घरात पोहोचला तेवढ्यात पोलिसांनी त्याला पकडले यात मुख्य दरोडेखोड पकडण्यात पोलिसांना यश आले. पण, दरोडेखोरासोबत असलेल्या साथीदाराने पोलिसांवर गोळीबार केला आणि तिथून पळ काढण्यास तो यशस्वी झाला. दरोडेखोराच्या साथीदारांचा शोध सध्या सुरु आहे.

BCCI New Selection Committee: नवीन निवड समितीसाठी बीसीसीआयने मागवले अर्ज, जाणून घ्या काय आहेत आवश्यक अटी आणि नियम

Latest Posts

Don't Miss