Sunday, May 19, 2024

Latest Posts

पुण्यात प्रदूषण वाढले!, हवेची गुणवत्ता पातळी पुन्हा खालवली…

दिवाळी सुरु आहे. दिवाळीच्या दिवसात सर्वत्र फटाके फोडले जातात. तर गेल्या काही दिवसांपासून देशातील हवा देखील बिघडत जात आहे.

दिवाळी सुरु आहे. दिवाळीच्या दिवसात सर्वत्र फटाके फोडले जातात. तर गेल्या काही दिवसांपासून देशातील हवा देखील बिघडत जात आहे. वायू प्रदूषणात वाढ झाल्याने आरोग्याची चिंता सतावतेय. अनेकांना श्वसनासंबंधीचे आजार देखील उदभवू लागले आहेत. तर नुकतीच पुण्यातून एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. पुणे (Pune) शहरात हवेची गुणवत्ता पातळी (Air Quality Index) पुन्हा खालवली आहे. पुणे शहरात हवा प्रदूषणामध्ये मोठी वाढ झाली आहे. पुण्यातील एअर क्वालिटी इंडेक्स १५० वरून थेट २६३ वर पोहोचला आहे. पुणे महानगरपालिकेकडून हवा प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यास सुरुवात झाली आहे.

मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक शहरांमधील हवा गुणवत्ता खालवल्याचं चित्र दिसत आहे. मागील २४ तासात राज्यातल्या अनेक शहरांचा हवा गुणवत्ता निर्देशांक समाधानकारक श्रेणीतून मॉडरेट श्रेणीत घसरला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीवरुन हे स्पष्ट झालं आहे. राज्यातील अनेक शहरात प्रदूषक पीएम २.५, पीएम १० च्या धुलिकणांच्या मात्रेत वाढ झाल्याचं दिसून येत आहे. पुण्यात NO2 तर जालन्यात O3 प्रदूषकाची मात्रा वाढली आहे. मागील अनेक दिवसांपासून मुंबई आणि पुण्यातील हवा गुणवत्ता पातळी माॅडरेट श्रेणीत दिसत होती, ज्यामुळे अनेकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचं दिसलं. पुन्हा एकदा प्रदूषणात भर पडताना दिसत आहे. वायू प्रदूषण कमी करण्यासंदर्भात महापालिका प्रशासना विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. प्रदूषण रोखण्यासाठी शहरात गर्दीच्या चौकांमध्ये लवकरच मिस्ट बेसड् फाउंटन उभारण्यात येणार आहे. हवा प्रदूषण रोखण्यासाठी आणि हवेची गुणवत्ता वाढवण्यासाठी महापालिका अनेक उपाययोजना राबवणार आहे.

हवेचा गुणवत्ता निर्देशांक म्हणजे काय?

हवेतील प्रदुषणाचे मोजमाप म्हणजेच हवेचा गुणवत्ता निर्देशांक होय. वायुप्रदूषणाची पातळी दर्शविण्यासाठी हवेचा गुणवत्ता निर्देशांक (Air Quality Index – AQI) सांगितला जातो. त्यावरून त्या त्या दिवसाची वायुप्रदूषण पातळी किती आहे, याचा अंदाज घेतला जातो.

हवेचा गुणवत्ता निर्देशांक कसा मोजतात?

सुक्ष्म कण (PM 2.5 आणि PM 10), ओझोन (O3), नायट्रोनज डायऑक्साइड (NO2), सल्फर डायऑक्साइड (SO2), कार्बन मोनॉऑक्साइड (CO) हवेत हे प्रदूषित घटक असतात. हे प्रदूषक घटक हवेत मिसळल्यास वायू प्रदूषण होते. या प्रदूषकांची सांद्रता मूल्ये तपासली जातात. त्यानुसार, हवेचा गुणवत्ता निर्देशांक काढला जातो.

या श्रेणींनुसार रंगही दिले जातात

० ते ५० चांगल्या हवेच्या स्थितीला हिरवा रंग आहे, ५० ते १०० समाधानकारक स्थितीला पिवळा रंग, १०१ ते १५० मध्यम प्रदूषित स्थितीला नारिंगी, १५१ ते २०० खराब स्थितीला लाल रंग, २०१ ते ३०० अतिशय खराब स्थितीत निळा रंग आणि ३०० ते ५०० गंभीर परिस्थिती चॉकलेटी रंग दिला जातो.

Latest Posts

Don't Miss