Sunday, May 19, 2024

Latest Posts

PUNE: PMPML कडून फुकट्या प्रवाशांकडून कोटींचा दंड वसूल

दर महिन्याला पीएमपीला फुकट्या प्रवाशांच्या कारवाई मधून दहा ते बारा लाखांचे उत्पन्न मिळते.

पुणे महानगर परिवहन महामंडळाने (Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd) पीएमपी (PMP) ने बस मधून विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. गेल्या दहा महिन्यात फक्त फुकट प्रवाशांकडून सव्वा कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. महिन्याला अंदाजे दहा लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

पुणे (PUNE) आणि पिंपरी चिंचवड (PIMPARI CHINCHWAD) आणि पीएमआरडीए (PMRDA) च्या हद्दीत पुणे महानगर परिवहन महामंडळाने (Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd) सतराशे बसच्या माध्यमातून सार्वजनिक बस सेवा दिली जाते. या बसमधून दिवसाला बारा ते तेरा लाख प्रवासी प्रवास करतात. त्यातून दीड ते दोन कोटींच्या दरम्यान उत्पन्न मिळते. तरीही पीएमपी (PMP) तोट्यात असून प्रत्येक वर्षी संचलन तूट वाढत आहे. पीएमपी कडून बसमध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाईसाठी तिकीट तपासणीक नेमण्यात आले आहेत. या पथकांकडून वेगवेगळ्या मार्गावर अचानक जाऊन बसची तपासणी केली जाते. त्यामुळे दीड ते दोन हजारांच्या दरम्यान फुकटे प्रवासी आढळून येतात.

पीएमपीसीमध्ये  (PMPC) तिकीट कमीत-कमी पाच रुपयांपासून जास्तीत जास्त ८० रुपयांपर्यंत आहे. लांब पल्ल्याच्या अंतराच्या तिकिटात थोडीफार रक्कम अधिक असू शकते. मात्र दहा ते वीस रुपये वाचवण्याच्या नादात तपासणी पथकाच्या हाती लागल्यावर पाचशे रुपयांचा दंड भरावा लागतो. दर महिन्याला पीएमपीला फुकट्या प्रवाशांच्या कारवाई मधून दहा ते बारा लाखांचे उत्पन्न मिळते. फुकट प्रवाशांमध्ये महाविद्यालयीन तरुण-तरुणी (COLLEGE STUDENTS) जास्त प्रमाणात सापडल्याचे पीएमपी अधिकाऱ्यांनी सांगितले. पीएमपीत ३५० कर्मचारी तिकीट तपासण्याचे कार्य करतात. त्यांना यासाठी ५ चार चाकी वाहने देण्यात आली आहेत. तिकीट चेकरची पथके ३७९ पेक्षा अधिक मार्गावर जाऊन बसची तपासणी करतात. विना तिकट आढळून आल्यास प्रवाशांकडून दंड वसूल केला जातो. दंड वसूल करण्यात येत असला, तरीही फुकट्या प्रवाशांची संख्या कमी होताना दिसून येत नाही. त्यामुळे पीएमपी (PMP) च्या सेवेत फुकट्या प्रवाशांमुळे फायदा होताना दिसून येत आहे. 

हे ही वाचा:

किडनी रुग्णांना या पदार्थांनी पोहोचू शकतो शरीराला गंभीर धोका

आमदार रविंद्र धंगेकर ललित पाटील प्रकरणी पुन्हा एकदा आक्रमक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss