पुण्यात उकाड्यापासून पुणेकरांना दिलासा

पुण्यामध्ये मुसळधार पावसाळा सुरुवात झाली आहे. एवढेच नाही तर काही ठिकाणी गारपिटला देखील सुरुवात झाली आहे.

पुण्यात उकाड्यापासून पुणेकरांना दिलासा

पुण्यामध्ये मुसळधार पावसाळा सुरुवात झाली आहे. एवढेच नाही तर काही ठिकाणी गारपिटला देखील सुरुवात झाली आहे. अचानक पावसामुळे आल्यामुळे पुणेकरांची तारांबळ उडाली आहे. दिवसभर राज्यात त्याचबरोबर पुण्यात उकाडा जाणवत होता. त्यामुळे अचानक पावसाने लावलेल्या हजेरीमुळे पुणेकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.

पुण्यामधील भुगाव, सांगवी, औंध या परिसरामध्ये गारपीट झाली तर बाकी परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पिंपरी चिंचवडमध्येही पावसाने हजेरी लावली आहे. आज सकाळपासूनच राज्यामध्ये उन्हाचे चटके बसत होते. अचानक आलेल्या पावसामुळे परिसरामध्ये गर्व निर्माण झाल्याचे दिसून आले आणि शहरवासीय देखील सुखावले आहेत.

पाच दिवस पुण्यामध्ये काही ठिकाणी ऊन तर काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवण्यात आली होती. ३० मे रोजी दिवसभर काही प्रमाणामध्ये ऊन असेल तर संध्याकाळी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे असा अंदाज हवामान खात्याने लावला आहे. त्यामुळे पुण्यामध्ये पुढील चार दिवस आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे आणि काही प्रमाणत पावसाचीदेखील शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हे ही वाचा:

IPL २०२३ च्या फायनलला वरुणराजाची उपस्थिती ; वादळी वाऱ्यासह आगमन

IPL 2023 Final, आज रंगणार महामुकाबलाचा थरार… कोण पटकवणार IPL 2023 मान? जाणून घ्या सविस्तर माहिती

दिल्लीच्या जंतरमंतरवर कुस्तीपटू आणि पोलिसांमध्ये झाला राडा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version