Friday, May 17, 2024

Latest Posts

Navale Bridge Accident : ब्रेक फेल नव्हे, तर ‘या’ कारणामुळे घडला नवले ब्रिजवर अपघात

सातारा ते मुंबई महामार्गावरील नर्‍हे स्मशानभूमीच्या वरील बाजूला असलेल्या भूमकर पुलाजवळ एका ट्रेलरने उतारावर ४७ वाहनांना जोरदार धडक दिली. त्यामुळे संपूर्ण परिसरात एकाच हाहाकार उडाला काल रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे. या ट्रेलरने पुढे असलेल्या वाहनांना एका पाठोपाठ धडक देत सुमारे ४०० ते ५०० मीटरच्या अंतरातील ४७ हून अधिक वाहनांना धडक दिली. त्यात प्रामुख्याने कारचा समावेश आहे. त्यानंतर ओम लॉजिंगच्या समोरील बाजूला हा ट्रेलर जाऊन थांबला. या अपघातानंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली होती. ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत होतं. परंतु याचं धक्कादायक कारण स्पष्ट झालेलं आहे.

हेही वाचा : 

‘…यापुढे भाजपला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेण्याचा अधिकार नाही’; सुप्रिया सुळे

कंटेनरचे ब्रेक फेल झाल्यानं हा अपघात झाल्याचं म्हटलं जात होतं. मात्र, कंटेनरचे ब्रेक फेल झालं नसल्याचं तपासात उघड झालं आहे. तर, चालकाने गाडी न्यूट्रल करून उतारावर इंजिन बंद करून गाडी चालवल्याने हा प्रकार घडला असल्याचं समोर आलं आहे. या अपघातानंतर चालक अजूनही फरार आहे. पुणे शहरातील कायम व्यस्त असलेल्या नवले पुलावर झालेल्या भीषण अपघातात आत्तापर्यंत एकूण ४७ वाहने समाविष्ट असल्याचे समजले आहे. किमान १० जखमींवर शासकीय रुग्णवाहिका १०८ मध्ये उपचार केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. गर्दीच्याच वेळी या कंटेनरने अनेक वाहनांना धडक दिली. यात बऱ्याच वाहनांचं नुकसान झालं आहे.

Lokmanya : टिळकांचा असामान्य प्रवास आता मालिकारुपात; लोकमान्यांच्या भूमिकेत दिसणार ‘हा’ अभिनेता

रस्त्यावरून जाणाऱ्या तब्बल २४ वाहनांना कंटेनरने अक्षरशः चिरडले. या भीषण अपघातात १३ जण गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात कार, रिक्षा, दुचाकी अशा वाहनांचा चक्काचूर झाला. या घटनेमुळे महामार्गावर ४ ते ५ किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. एका ड्रायव्हरच्या या मस्तीमुळे १३ जण जखमी झालेत तर २४ वाहनांचं नुकसान झालंय.

खासदार सुप्रिया सुळे यांनी आज घटनास्थळी जात पाहाणी केली. कंटनेनरचालक मनीलाल यादव याच्यावर गुन्हा दाखल झालेला असून तो फरार आहे. यादव हा मुळचा मध्य प्रदेशचा आहे. त्याच्यावर सिंहगड पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

राज्यपालांवर टीका करतांना अंबादास दानवेंची जीभ घसरली

Latest Posts

Don't Miss