Tuesday, May 21, 2024

Latest Posts

राज्यात “या” भागाला येलो अलर्ट; उष्णतेचा तडाखा वाढला

उष्णतेचे प्रमाण वाढत असल्याने मराठवाडा, मुंबई,रायगड आणि ठाण्यात आज यलो अलर्ट देण्यात आले आहे तर, विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

एप्रिल महिन्या अखेरीस उष्णतेचा तडाखा अधिकाधिक वाढत आहे. सुर्य आग ओकत असताना तापमानाची झळ अनेकांना लागत आहे. राज्यात ढगाळ वातावरण निवळल्याने अक्षरश: आता कोरडे वातावरण निर्माण झाले आहे. मालेगावात पारा ४४ अंशांवर पोहोचला. किनारपट्टीलाही उष्णतेच्या झळांचा सामना करावा लागला. सांताक्रुजमध्ये पारा ३९.१ अंश सेल्सिअसवर गेल्यामुळे मुंबईकरांना असह्य उकाड्याचा सामना करावा लागत आहे. उष्णतेचे प्रमाण वाढत असल्याने मराठवाडा, मुंबई,रायगड आणि ठाण्यात आज यलो अलर्ट देण्यात आले आहे तर, विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात रात्री उकाडा जाणवण्याची शक्यता आहे. सांगली व सोलापूर नांदेड लातूर व धाराशिव येथे काही ठिकाणी आज रात्री उकाडा जाणवण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भात पुढील तीन ते चार दिवस हवामान कोरडे राहणार असून कोकण, गोवा व महाराष्ट्रात देखील कोरडे हवामान राहणार असल्याची शक्यता आहे.गुजरात आणि राजस्थानात उष्णतेचे वारे असल्याने राज्यात तापमानात वाढ होत आहे.पुण्यात ४१. ८ अशा तापमानाची नोंद झाली. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. रायगड येथे आज ३७. डिग्री अंश इतका आहे.

मालेगावमध्ये आता पर्यंतचे सर्वाधिक ४४ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर जळगाव जिल्ह्यात ४२ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नांदेड, अकोला, ब्रह्मपुरी येथे ४२ डिग्री सेल्सिअसच्या पुढे तापनाची नोंद झाली. काल मुंबईत ३५.२, ठाणे ३८ अंश, सांताक्रुजमध्ये ३९.१, अलिबागमध्ये ३४.२ आणि डहाणूत ३६.४ अंश सेल्सिअस तापमान होते. तर आज ठाणे, रायगड, मुंबईला उष्णतेसाठी ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

हे ही वाचा:

महाराष्ट्रातुन गुजरातला उद्योगधंदे पळवलात आता निवडणूकीत महाराष्ट्र आठवला का? Nana Patole यांचा PM Modi यांना सवाल

जनतेच्या संपत्तीवर काँग्रेसचा डोळा आहे, PM Narendra Modi यांचे साताऱ्यातून विरोधकांवर टीकास्त्र

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss