अजित पवारांनी केला जागा वाटपाचा मोठा खुलासा

शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) प्रमुख नेत्यांची रविवारी बैठक पार पडली.

अजित पवारांनी केला जागा वाटपाचा मोठा खुलासा

शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) प्रमुख नेत्यांची रविवारी बैठक पार पडली. कर्नाटक निवडणूक आणि सत्तासंघर्षावरील निकालावर या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली यानंतर महाविकास आघाडीचे पत्रकार परिषद सुद्धा घेण्यात आली होती. या दरम्यान रविवारी झालेल्या महाविकास आघाडीचा बैठकीवर विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली त्यावेळी ते म्हणाले २०१४ पासून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रात आणि राज्यामध्ये भाजप सरकार आले कर्नाटकमध्ये ही कार्यकर्त्यांमध्ये मोठा जोश होता.

कर्नाटकमधील निवडणुकीत भाजपचा पराभव झाला त्यामुळे निराशा पसरल्याचे अजित पवार म्हणाले. त्याचबरोबर २०१४ लोकसभा आणि विधानसभेच्या जागा वाटपावर बोलताना अजित पवार म्हणाले की, मागच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी होती. पण आता ठाकरे गटासोबत आहोत. त्यामुळे तिघांनी ४८ जागा वाटपाबद्दल चर्चा करावी तसेच २८८ विधानसभेच्या जागा वाटपावर ही निर्णय घ्यायला हवा असा खुलासा अजित पवार यांनी यावेळी केला आहे. अजित पवार असेही म्हणाले की, जागा वाटप करताना प्रत्येक पक्षातील दोन नेत्यांमध्ये बसून चर्चा होईल.

अजित पवार यांनी जयंत पाटील यांच्या आलेल्या इडलीच्या नोटीस वर सुद्धा प्रतिक्रिया त्यांनी दिली यावेळी ते म्हणाले की. आज जयंत पाटील यांच्याबरोबर पाच वाजता मिटींग आहे त्यांना आज भेटणार आहे मी बातमी वाचली आहे नक्की काय प्रकरण आहे माहिती नाही अशी माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली. पवार यांच्या या वक्तव्यामुळे दोघांच्या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा : 

युनेस्कोला बारसूमध्ये कातळ शिल्प सापडली

राज ठाकरेंनी केली मुंबई -गोवा महामार्गाची समृद्धी महामार्गासोबत तुलना

Raj Thackeray यांचा शरद पवरांवर निशाणा, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शरद पवार घेत नाहीत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version