छगन भुजबळ यांनी अजित दादांबद्दल दाखवला विश्वास

नुकताच राष्ट्रवादीचे अधिवेशन पार पडले. अधिवेशन पार पडल्यानंतर सत्ताधाऱ्यांवर सडकवून टीका देवही करण्यात आली. टीका करत असताना छगन भुजबळ यांनी अनेक मुद्यांना हात घातला .

छगन भुजबळ यांनी अजित दादांबद्दल दाखवला विश्वास

नुकताच राष्ट्रवादीचे अधिवेशन पार पडले. अधिवेशन पार पडल्यानंतर सत्ताधाऱ्यांवर सडकवून टीका देवही करण्यात आली. टीका करत असताना छगन भुजबळ यांनी अनेक मुद्यांना हात घातला . तसेच अधिवेशनांच्या वेळेस देखील सत्ताधाऱ्यांवर विरोधकावर टीका करण्यात आली. यावर भुजबळ म्हणाले की, “निवडणूक आली म्हणून आम्ही अधिवेशन घेतले, असे बोलले जात आहे. हे त्यांचे अज्ञान आहे. ओबीसींसाठी आजवर काय केले, तुम्ही काय करत होते. राष्ट्रवादी काँग्रेस आणि छगन भुजबळ लढत आहे. भिडे वाडा, आरक्षणसाठी लढत आहे. सावित्रीबाई फुले यांच्याबाबत भाष्य केले. त्याचे पुतळे हटवले, तेव्हा आम्ही बोललो. राष्ट्रवादी काँग्रेस, ओबीसीबाबतीत आम्ही सतर्क आहोत. मागे फडणवीस यांनी घोषणा केली, पुढे काही झाले नाही. तसेच नागपूर ओबीसी अधिवेशन भाजपचे ते अज्ञान, वर्धापनदिन नगरला करतो आहे. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील लोकांच्या समस्या आणि आपली मत तिथं मांडता येतात. छगन भुजबळ ओबीसीचा असून ओबीसीचे लोक कोर्टात लढत आहे. भिडे वाडा, ओबीसी आरक्षणासाठी, वसतिगृहासाठी लढा देत असून राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसीबाबत सतर्क असल्याचे भुजबळ म्हणाले.

अजितदादा (Ajit Pawar) मुख्यमंत्री होतील, अशी आमदार नरहरी झिरवाळ यांची सदिच्छा आहे. मात्र त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मेहनत घ्यावी लागेल. म्हणजेच जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. मात्र सध्यातरी अजित पवार यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद आहे, असे छगन भुजबळ म्हणाले. महाविकास आघाडी म्हणून जास्त जागा निवडून आल्या पाहिजे. त्यात राष्ट्रवादीच्या जास्त जागा आल्या तर अजितदादा मुख्यमंत्री होऊ शकतात, असा विश्वासही छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे. छगन भुजबळ हे नाशिकमध्ये असताना त्यांनी माध्यमाशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. छगन भुजबळ यांनी यावेळी अनेक मुद्द्यांवर भूमिका व्यक्त केली. सुरुवातीलाच सुरगाणा येथे अजित पवार यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात नरहरी झिरवाळ यांनी भाषणादरम्यान अजित पवार मुख्यमंत्री होतील, असे वक्तव्य केले. यावर छगन भुजबळ म्हणाले की, अशी झिरवाळ यांची सदिच्छा आहे. मात्र यासाठी महाविकास आघाडी म्हणून जास्त जागा निवडून आल्या पाहिजे. त्यात राष्ट्रवादीच्या जास्त जागा आल्या तर अजितदादा मुख्यमंत्री होऊ शकतात, असा विश्वासही छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान शिंदे-फडणवीस यांनी नुकतीच अमित शाह यांची भेट घेतली. यावर भुजबळ म्हणाले की त्यांचे नेते दिल्लीत असल्याने ते भेटायला जातात. काँग्रेसचे नेतेही दिल्लीत भेट घेण्यासाठी जातात ना, शरद पवार आम्हाला कुठेही भेटतात. ते कधी तरी जातात म्हणून बातमी होते, असा टोलाही लगावला. तसेच प्रत्येक पक्षाने मुख्यमंत्री होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. प्रत्येक नेत्याने प्रयत्न केले पाहिजे. पण जास्त आमदार निवडून येण्याचे योगदान दिले पाहिजे. अजित पवार यांच्या कानाखाली मारेन, या वक्तव्यावरुन भुजबळ म्हणाले की, कानात ओरडून सांगेन, असा त्याचा अर्थ आहे. अजित पवार यांनाही तेच म्हणायचं होत. ओरडले म्हणचे ऐकू जाते, असे म्हणत भुजबळांनी अजित पवारांना सावरुन घेतले.

हे ही वाचा : 

नितेश राणेंचा संजय राऊतांवर पलटवार

विनोद तावडे यांनी केलेल्या विधानामुळे चर्चाना उधाण

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version