Tuesday, May 14, 2024

Latest Posts

Praful Patel Live, देश, राज्य आणि पक्षाला पवारांची गरज, निर्णय पक्षाला मान्य नाही

राज्याच्या राजकारणातील (Maharashtra Politics) सर्वात मोठी बातमी.

राज्याच्या राजकारणातील (Maharashtra Politics) सर्वात मोठी बातमी. राष्ट्रवादीच्या (National Congress Party) सदस्या समितीनं शरद पवार (Sharad Pawar) यांनी घेतलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय फेटाळला आहे. आणि या संदर्भात प्रफुल पटेल यांनी पत्रकार परिषद ही घेतली आहे.

आज प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषद ही घेतली यावेळी बोलत असताना प्रफुल्ल पटेल यांनी अनेक मुद्दे मांडले आहेत. यावेळी प्रफुल्ल पटेल म्हणले, यशवंत राव चव्हाण येथे चालू असणाऱ्या सोहळ्यात आदरणीय शरद पावरा यांनी त्यांच्या भाषणात अचानक एक अतिशय महत्वाची सुचना केली. राष्ट्रवादी पक्षाच्या दह्य्क्ष पदाचा राजीनामा बाबत ही सूचना करण्यात आली होती. आणि त्याच दिवशी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस च्या अध्यक्ष पदाची जबाबदारी कोणाकडे सोपवावी त्यासाठी समिती देखील निवड करण्यात आली होती. माझं नाव पहिले असल्यामुळे या समितीचे निमंत्रक म्हणून हि जबाबदारी माझ्या कडे होती. असं देखील प्रफुल्ल पटेल म्हणाले. आम्हाला या बाबत अजिबात कल्पना न्हवती हि शरद पवार असा निर्णय देतील. आम्ही त्यांना विनंती करत राहिलो देशाला राज्याला आणि पक्षला तुमची गरज आहे.

तसेच यावेळी प्रफुल्ल पटेल म्हणाले आहेत की, चव्हाण सेंटरच्या कार्यक्रमानंतर अनेक जण त्यांना भेटून गेले. सर्वांनी मिळून विनंती केली की देशाला तुमची गरज आहे. नाव आणि अधारस्तंभ तुम्हीच आहात. देशात सन्मानित नेता फक्त शरद पवार आहेत. परवा पंजाबला आम्ही गेलो होतो त्यावेळी पंजाबचे शेतकरी भेटले ते म्हणत होते पवारांनी शेतकऱ्यांसाठी केलेले काम विसरु शकत नाही. मागील २- ३ दिवसांत देशातील दिग्गज नेते शरद पवार यांना भेटून जात होते. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षची भावना पाहायला मिळत होती. पक्षात अनेक मान्यवर राज्यांत आणि देशातील अनेकजण विनंती करत होते की त्यांनी पद सोडू नये.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रीय पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. समिती एकमतानं त्यांचा राजीनामा नामंजूर करतेय. पक्षाच्या अध्यक्षपदी त्यांनी कायम राहावं, अशी समितीची मागणी; राष्ट्रवादी सदस्य समितीचा निर्णय असं आज प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.

तसेच प्रफुल्ल पटेल पुढे म्हणाले, देशभरातील नेत्यांनी शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा म्हणून गळ घातली. पंजाबला प्रकाश सिंग बादल यांच्या अंत्यसंस्काराला गेलो होतो, तिथेही अनेक नेत्यांनी शरद पवार यांची देशाला गरज असल्याचं मत व्यक्त केलं. पवार साहेबांसारखा नेता देशात नसल्याचं सर्वांनीच सांगितलं.पवार साहेबांनी या सक्रिय पदावरून जाऊ नये असं मत व्यक्त केलं. गेल्या दोन ते तीन दिवसापासून कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना सर्वांनी पाहिल्या आहेत, असं पटेल यांनी सांगितलं. सर्वच कार्यकर्त्यांच्या मनात वेदना, दु:ख आणि नाराजी आहे. आम्ही त्याकडे दुर्लक्ष करू शकणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.

शरद पवार यांनी आम्हाला कोणालाही विश्वासात न घेता निर्णय घेतला. पण समितीने बैठक आज बोलावली. बाहेरच्या राज्यातील नेतेही या समितीत आहेत. त्यामुळे त्यांना येण्यासाठी ही बैठक थोडी लांबली. आज बैठक झाली. त्यात एक ठराव मंजूर केला आहे. सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला आहे. आता हा प्रस्ताव घेऊन आम्ही पवारांना परत अध्यक्षपदी राहण्याची विनंती करणार आहोत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा विचार केला होता. हा राजीनामा एकमताने नामंजूर करून त्यांनाच अध्यक्ष म्हणून एकमताने निवडण्यात येत आहे.

हे ही वाचा : 

शरद पवारांचा राजीनामा फेटाळल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष

मोठी बातमी, शरद पवारांचा राजीनामा फेटाळला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss