Monday, April 29, 2024

Latest Posts

शरद पवारांचा राजीनामा फेटाळल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष

शरद पवारांचा राजीनामा एकमताने ना मंजूर केल्यांनतर कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला आहे. कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर उपस्थित राहून त्यांचा आनंद व्यक्त करत आहे.

शरद पवारांचा राजीनामा एकमताने ना मंजूर केल्यांनतर कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला आहे. कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर उपस्थित राहून त्यांचा आनंद व्यक्त करत आहे. गेल्या तीन दिवसांपासून कार्यकर्त्ये ठाण मांडून बसले होते त्यांनी त्यांचा आत्मक्लेश सुद्धा केला होता. राष्ट्रवादी बाहेर उभे असलेले सर्व कार्यकर्ते साहेब साहेब म्हणून घोषणा करत आहेत. शरद पवारांनी अध्यक्ष राहावं असे एकमताने ठराव मंजूर करण्यात आला आहे. निवड समितीच्या बैठकीमध्ये राजीनामा नामंजूर करण्याचा ठराव पास झाला आहे. बैठकीमध्ये मजूर केलेले ठराव पवारांना कळवळा जाणार आहे. शरद पवारांनी निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी करण्यात येत आहे.

शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन तीन दिवस झाले आहेत. परंतु कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. त्यामुळे आज समितीच्या बैठकीमध्ये महत्वाचा निर्णय होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल रमेश बैस यांची अचानक भेट घेतली. शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्ष पदावर राहावे. त्यांचा निर्णय मागे घ्यावा हा प्रस्ताव एकमताने मंजूर झाला. अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे. शरद पवारांच्या घराची सुरक्षा वाढवली, कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. एका कार्यकर्त्याने आत्मदहनाचा प्रयत्न केल्यामुळे पोलीस देखील सतर्क झाले आहेत.

हे ही वाचा : 

“राज ठाकरे यांनी जसे त्यांच्या काकांवर लक्ष ठेवले तसे मी माझ्या काकांवर लक्ष ठेवेल”, अजित पवारांचे प्रत्युत्तर

वरळीच्या पोद्दार आयुर्वेद महाविद्यालयात विद्यार्थ्याचा मृत्यू

मुंबईकरांनो घराबाहेर पडण्याचा विचारात असाल तर एकदा रेल्वेचे वेळापत्रक नक्की पहा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss