Monday, April 29, 2024

Latest Posts

मोठी बातमी, शरद पवारांचा राजीनामा फेटाळला

राज्याच्या राजकारणातील (Maharashtra Politics) सर्वात मोठी बातमी. राष्ट्रवादीच्या (National Congress Party) सदस्या समितीनं शरद पवार (Sharad Pawar) यांनी घेतलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय फेटाळला आहे. शरद पवारांचा राजीनामा समितीकडून फेटाळण्यात आला आहे आणि त्याचा प्रफुल्ल पटेलांनी राजीनामा फेटाळण्याचा प्रस्ताव मांडला आहे. शरद पवारांच्या पवारांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पवारांचे अध्यक्ष पद राहावे यासाठी कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर कार्यकत्यांची प्रचंड गर्दी आहे. महिला कार्यकर्त्या सुद्धा प्रचंड जमा झाल्या आहेत. शरद पवारांचा राजीनामा निवड समितीकडून फेटाळण्यात आला आहे. समितीची शिफारस पवारांना कळवली जाणार आहे. आता सर्वांचे लक्ष शरद पवार यांच्या निर्णयाकडे असणार आहे. शरद पवारांनीच अध्यक्ष राहावे असे बैठकीमध्ये एकमताने मंजूर करण्यात आले आहे.

अध्यक्ष निवडीच्या समितीमध्ये कोण कार्यकर्ते असणार आहेत – 
प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, के.के. शर्मा, पी.सी. चाको, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जयदेव गायकवाड तसेच नरहरी झिरवाळ, फौजिया खान,धीरज शर्मा, सोनिया दूहन यांचा समावेश आहे. दोन दिवसापूर्वीच शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा करण्यात आली होती. यांनतर राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांसह पदाधिकारी यांच्या कार्यकर्त्यांनी राजीनामा मागे घेण्याची मागणी लावून धरली आहे.

हे ही वाचा : 

राज्यामध्ये दोन दिवस अवकाळी पावसाची शक्यता, हवामान विभागाचा इशारा

राज्यामध्ये दोन दिवस अवकाळी पावसाची शक्यता, हवामान विभागाचा इशारा

GTvsRR, कोण ठरणार वरचढ? गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss