एकनाथ शिंदेंची मद्यसेवन करून वाहने चालवणाऱ्यांवर ठोस कारवाई

राज्यामध्ये मद्यसेवन आणि निष्काळजीपणामुळे वाहने चालवल्यास अनेक अपघात झाले आहेत. त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

एकनाथ शिंदेंची मद्यसेवन करून वाहने चालवणाऱ्यांवर ठोस कारवाई

राज्यामध्ये मद्यसेवन आणि निष्काळजीपणामुळे वाहने चालवल्यास अनेक अपघात झाले आहेत. त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या संदर्भामध्ये आता सरकारने ठोस पाऊल उचलले आहे. विनाकारण तसेच मद्यसेवन करून वाहने चालवणाऱ्यांना सेवेच्या चालकांच्या विरुद्ध जामीन पात्र गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भामध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली होती. यासंदर्भामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिमाचल प्रदेशाच्या धर्तीवर कायद्याच्या सुधारणा करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठवला आहे. निष्काळजीपणामुळे वाहन चालकाच्या प्रवाशांना जीव गमवावा लागू नये यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे पाऊल उचलले आहे आणि या चालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे सांगितले आहे.

मुख्यमंत्र्यांनी घेतलेला बैठकीमध्ये पोलीस महासंचालक रजनीश सेठ, गृह विभागाचे प्रधान सचिव, अपर पोलिस महासंचालक वाहतूक रवींद्र सिंघल, परिवहन आयुक्त विवेक भिमनवार अधिकारी यावेळी या बैठकीला उपस्थित होते. रस्त्यावर बेडरकारपणे तसेच मद्यसेवन करून निष्काळजीपणाने वाहन चालवल्यास अपघात आणि त्यामुळे निष्पाप प्रवास यांचा मृत्यूच्या प्रमाणामध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. २०२१ मध्ये अति वेगाने वाहन चालवल्यामुळे झालेल्या अपघातांची संख्या २०८६० आहेत तर त्यामध्ये ९८२९ जणांचा मृत्यू झाला आहे असे या सांगण्यात आले. या बैठकीमध्ये गृह विभागाने यासंदर्भात रस्त्यांवर निष्काळजीपणे वाहन चालविणे हा अजामिनपात्र गुन्हा करण्याबाबतीत प्रस्तावावरही या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली.

हे ही वाचा : 

युनेस्कोला बारसूमध्ये कातळ शिल्प सापडली

राज ठाकरेंनी केली मुंबई -गोवा महामार्गाची समृद्धी महामार्गासोबत तुलना

Raj Thackeray यांचा शरद पवरांवर निशाणा, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शरद पवार घेत नाहीत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version