सगळ्यांनी तयार रहा, गाफील राहू नका, असे आदेश – उद्धव ठाकरे

सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) निर्णयानंतर ठाकरे गटातील बैठकांचे सत्र सुरुच आहे. पुढील रणनीती ठरवण्यासाठी कायदेशीर सल्ला घेत ठाकरे गट ॲक्शन मोडमध्ये येत आहे असे दिसत आहे. १८ जूनला मुंबईत राज्य आणि राष्ट्रीय कार्यकारणी आणि राज्यभरातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

सगळ्यांनी तयार रहा, गाफील राहू नका, असे आदेश – उद्धव ठाकरे

सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) निर्णयानंतर ठाकरे गटातील बैठकांचे सत्र सुरुच आहे. पुढील रणनीती ठरवण्यासाठी कायदेशीर सल्ला घेत ठाकरे गट ॲक्शन मोडमध्ये येत आहे असे दिसत आहे. १८ जूनला मुंबईत राज्य आणि राष्ट्रीय कार्यकारणी आणि राज्यभरातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची प्रमुख म्हणून फेरनिवड होण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या गोटात सध्या प्रचंड हालचाली सुरु आहेत. विधानसभा अध्यक्षांपुढील सुनावणी, निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयापुढे कोणत्याही कायदेशीर आणि तांत्रिक त्रुटी राहू नयेत, यासाठी हे पाऊल उचललं जाणार आहे. शिवसेना राष्ट्रीय कार्यकारिणी, राज्य कार्यकारणी आणि राज्यभरातील पदाधिकाऱ्यांची बैठक १८ जूनला मुंबईत होणार आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे यांची पुन्हा पक्षप्रमुखपदी निवड केली जाण्याची शक्यता आहे.

कायदेतज्ञांशी सल्लामसलत करुन त्याबाबतचे तपशील ठरवले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. शिवसेना राष्ट्रीय, राज्य कार्यकारिणी व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी तालुका पातळीपासूनच्या सुमारे तीन-साडेतीन हजार प्रमुख पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. वरळी येथील राष्ट्रीय क्रीडा केंद्रांत ही बैठक होणार आहे. शिवसेनेचा वर्धापनदिन १९ जूनला होणार असून ठाकरे यांची षण्मुखानंद सभागृहात सभाही होणार आहे. या बैठकीमध्ये नेमके काय ठरणार यावर सध्या लक्ष केंद्रित केले आहे.

शिवसेना भवन येथे ठाकरे गटाच्या राज्यातील सर्व जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुखांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांनी जिल्हाप्रमुखांना संबोधित करताना सत्तासंघर्षाच्या संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत देऊन या निकालातील महत्त्वाचे मुद्दे तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवून संभ्रम दूर करण्याच्या सूचना केल्या आहेत. मुंबई महापालिकेसह राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात त्यामुळे सगळ्यांनी तयार रहा, गाफील राहू नका, असे आदेश पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत दिले आहेत.

हे ही वाचा : 

अखेर ठरला कर्नाटकाचा मुख्यमंत्री? या दिवशी होणार शपथविधी…

नीराजसिंह राठोड होता तरी कोण ? काय होता भाजपशी संबंध

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version