कर्नाटकातील नव्या सरकारला शुभेच्छा,आदित्य ठाकरेंचे काँग्रेसला साकडे

कर्नाटकातल्या सतत संघर्षानंतर काँग्रेसने कर्नाटकात बाजी मारली. कर्नाटकात काँग्रेसने सत्तास्थापन केली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यंत्र्यांनी आज नुकतीच त्यांच्या पदाची शपथ घेतली.

कर्नाटकातील नव्या सरकारला शुभेच्छा,आदित्य ठाकरेंचे काँग्रेसला साकडे

कर्नाटकातल्या सतत संघर्षानंतर काँग्रेसने कर्नाटकात बाजी मारली. कर्नाटकात काँग्रेसने सत्तास्थापन केली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यंत्र्यांनी आज नुकतीच त्यांच्या पदाची शपथ घेतली. विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या या अभूतपूर्व यशानंतर काँग्रेसला अच्छे दिन येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळातून रंगत आहे. त्यामुळे समविचारी असलेले बरेच नेते आज शपथविधीसाठी कर्नाटकात दाखल झाले आहेत. त्यापार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी कर्नाटकातील नव्या सरकारचे अभिनंदन केले आहे.

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने कर्नाटकात २२४ पैकी १३५ जागांवर विजय मिळवला. त्यामुळे काँग्रेसला येथे सत्ता स्थापन करण्याचा मार्ग एकदम मोकळा झाला. मुख्यमंत्री पदाचा पेचही संपुष्टात आला असून आज शपथविधी सोहळाही पार पडत आहे. त्यापार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी हे आवाहन केलं आहे. कर्नाटकात स्थापन होणाऱ्या नवीन सरकारला आम्ही शुभेच्छा देतो. पण तेथील मराठी भाषिक बांधवांना त्रास देऊ नये. या बांधवांकडे लक्ष द्या असं आम्ही नवीन सरकारला सांगत आहोत,असं आदित्य ठाकरे म्हणाले. त्याचप्रमाणे आदित्य ठाकरे यांनी त्यातही नव्या सरकारला त्यांच्या कडून कळकळीची एक महत्त्वाची विनंतीही केली आहे. तसेच आदित्य ठाकरे मुंबईच्या कुपरेज फुटबॉल ग्राऊंडमध्ये आयोजित केलेल्या वर्कशॉपला आज गेले होते. तेथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

तसेच आदित्य ठाकरे यांच्यासोबत पत्रकारांनी संवाद साधत असताना त्यानं सध्याच्या २००० रु.च्या नोटबंदीवर प्रश्न विचारला असता आरबीआयने २ हजारच्या नोटा बंद केल्या आहेत, याकडे तुम्ही कशा दृष्टीने पाहता, असा प्रश्न पत्रकारांनी आदित्य ठाकरेंना विचारला. त्यावर ते म्हणाले की, “नोटबंदीमुळे देशाच्या आर्थिक स्थितीवर काय परिणाम होईल यावर अभ्यास करणं गरजेचं आहे. गेल्या पाच ते सहा वर्षांत आरबीआयने सतत पुढे मागे पुढे मागे केलं आहे. त्यामुळे त्यावर स्पष्टीकरण येणं गरजेचं आहे. मुंबई महापालिका, महापौर आणि इतर मुद्द्यांवरून हे एकमेकांशी भांडत आहेत. मुंबईत फर्निचर खरेदी, रस्ते घोटाळा झाला. पुणे ,नाशिक महापालिकेत घोटाळे झाले आहेत. याची चौकशी झाली पाहिजे”, अशी मागणीही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली. आमचे सरकार असताना कोणतेही वाद झाले नाही, जातीय दंगली झाल्या नाहीत. आता निवडणुकीच्या तयारी साठी हे वाद आणि दंगली होत आहेत का? असा सवालही आदित्य ठाकरे यांच्या कडून करण्यात आला आहे.

हे ही वाचा : 

Karnataka ची सूत्र Siddaramaiah कडे, तर उपमुख्यमंत्रिपदी D. K. Shivakumar विराजमान, जाणून घ्या मंत्रिमंडळात कुणा कुणाचा समावेश…

Karnataka च्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला उद्धव ठाकरे अनुपस्थितीत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version