राजीनाम्याच्या घडामोडीमध्ये मी नव्हतो, छगन भुजबळ

राजीनाम्याच्या घामोडीच्या संदर्भामध्ये मला माहिती नव्हती. परंतु अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांना कल्पना होती. अर्धा कार्यक्रम सोडून मी कोर्टात गेलो होतो. तिथे मला कळले की, शरद पवार यांनी राजीनामा दिला आणि मला मोठा धक्का बसला.

राजीनाम्याच्या घडामोडीमध्ये मी नव्हतो, छगन भुजबळ

राजीनाम्याच्या घामोडीच्या संदर्भामध्ये मला माहिती नव्हती. परंतु अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांना कल्पना होती. अर्धा कार्यक्रम सोडून मी कोर्टात गेलो होतो. तिथे मला कळले की, शरद पवार यांनी राजीनामा दिला आणि मला मोठा धक्का बसला. कमिटी गठीत केली परंतु मी आधीच सांगितले कमिटीला हे मान्य नाही म्हणजेच राजीनाम्या संदर्भात कुटूंबातील नेत्यांना माहिती होती असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केला आहे. शरद पवार यांच्या राजीनामा नात्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. परंतु काल शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांचा निर्णय मागे घेतला आहे. या सर्व घडामोडींचा तर्क वितर्क मांडले जात आहेत आणि राजकीय वर्तुळामध्ये चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत.

या राजीनामाच्या नात्यावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, राजीनाम्याच्या घडामोडीमध्ये मी नव्हतो परंतु या संदर्भामध्ये अजित पवार, प्रफुल्ल पटेल (Prafull Patel) यांना कल्पना होती. त्या दिवशी मला अचानक कोर्टामधून काम आल्याने अर्ध्यातून कार्यक्रम सोडून जावे लागले होते. त्याच ठिकाणी राजीनाम्याच्या संदर्भामध्ये समजले आणि धक्काच बसल्याचे छगन भुजबळ म्हणाले. आज छगन भुजबळ हे नाशिकमध्ये आहे आणि सकाळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, शरद पवार यांनी लोक माझे सांगाती या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली.

महाराष्ट्राच्या राजकारणासह राष्ट्रवादी पक्षातून नेत्यांसह कार्यकर्त्यांना धक्का बसला. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या निर्णयाला विरोध होत असल्याचे समल्यानंतर सर्वाना एकत्र करत बैठक घेण्यात आली होती. या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादीचे सर्वच नेते उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांच्या बारसू दौऱ्यावर भुजबळ म्हणाले की, उद्योग येत नाही अशी वारंवार ओरड होत असते. त्यामुले जायला पाहिजे आणि लोकांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे उद्योग आले पाहिजे, पण त्याचा पर्यावरणला किती धोका आहे, हे सुद्धा तपासणे गरजेचे आहे. कोणताही प्रकल्प लादण्याची गरज नाही समर्थन आणि विरोधात आंदोलन करू नये. असे छगन भुजबळ म्हणाले.

हे ही वाचा : 

घरातील जुने, मळकटलेले सोफे स्वच्छ करायचेत? मग वापरा ‘या’ सोप्या टिप्स

अजित पवारांकडून निर्णयाचे स्वागत, तर पुढील ८ दिवस करणार राज्यभर दौरा

Raj Thackeray यांनी काढले अजित पवारांचे व्यंगचित्र, म्हणाले…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version