“राज ठाकरे यांनी जसे त्यांच्या काकांवर लक्ष ठेवले तसे मी माझ्या काकांवर लक्ष ठेवेल”, अजित पवारांचे प्रत्युत्तर

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी जसे त्यांच्या काकांवर लक्ष ठेवले तसे मी माझ्या काकांवर लक्ष ठेवेल असे प्रत्युत्तर विरोधी पक्षनेते अजित पवार (Raj Thackeray) यांनी दिले आहे.

“राज ठाकरे यांनी जसे त्यांच्या काकांवर लक्ष ठेवले तसे मी माझ्या काकांवर लक्ष ठेवेल”, अजित पवारांचे प्रत्युत्तर

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी जसे त्यांच्या काकांवर लक्ष ठेवले तसे मी माझ्या काकांवर लक्ष ठेवेल असे प्रत्युत्तर विरोधी पक्षनेते अजित पवार (Raj Thackeray) यांनी दिले आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी एक जाहीर मुलाखतीमध्ये अजित पवारांना सल्ला दिला होता. त्यावर पत्रकारांनी आज अजित पवारांना प्रश्न विचारला त्यावर अजित पवारांनी अतिशय सूचक विधान केले आहे. ‘लोकमत’च्या महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यामध्ये अमोल कोल्हे आणि अमृता फडणवीसांनी राज ठाकरेंची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी अमृता फडणवीसांच्या रॅपिड फायर प्रश्नावर राज ठाकरेंनी अजितदादांना सल्ला दिला होता.

राज ठाकरे आणि अजित पवार यांच्यामधील शाब्दिक द्वंद्व महाराष्ट्राला चांगलेच ठाऊक आहे. या आधी सुद्धा राज ठाकरे यांनी राज्यामध्ये आघाडीचे सरकार असताना अजित पवार यांना लक्ष केले होते. त्यांनतर अजित पवारांनी आपल्या खास शैलीमध्ये राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिले होते. पण आता राज ठाकरेंच्या मुलाखतीच्या निमित्ताने त्या दोघांमधल्या वाग्युद्धाची नवी ठिणगी पडली आहे. राज ठाकरे हे कायम त्यांच्या स्पष्ट वक्तेपणामुळे ओळखले जातात. त्यांची भाषणे व मुलाखती कायम चर्चेचा विषय असतात. राज ठाकरेंची कालच्या मुलाखतीमध्ये नेत्यांना दिलेले सल्ले दिले आहेत. अजित पवार यांना सल्ला द्याल असा प्रश्न केल्यांनतर राज ठाकरे यांनी काकांवर लक्ष ठेवा असे म्हंटले आहे.

हे ही वाचा : 

‘एकनाथ शिंदे सावध राहा’, राज ठाकरेंनी दिला मोलाचा संदेश

राज्यात नवं संकट? अवकाळी पावसाचा घातला धुमाकूळ!

CSK vs RR आमनेसामने, कोणाचं पारडं होईल भारी?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version