Friday, May 3, 2024

Latest Posts

१६ आमदार अपात्रेबाबत जयंत पाटलांनी दिले स्पष्टीकरण, नार्वेकर आमचे जावई…

गेल्या अनेक महिन्यापासून राज्यातील राजकारण हे अस्थिर आहे. अनेक आरोप प्रत्यारोप हे होत आहेत. काही महिन्यापूर्वी राज्यातील सत्तेत जी उलथापालथ झाली त्या संदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी ही चालू होती.

गेल्या अनेक महिन्यापासून राज्यातील राजकारण हे अस्थिर आहे. अनेक आरोप प्रत्यारोप हे होत आहेत. काही महिन्यापूर्वी राज्यातील सत्तेत जी उलथापालथ झाली त्या संदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी ही चालू होती. या सत्तासंघर्षाबाबत अखेर सर्वोच्च न्यायालयाने निकाल हा दिला आहे. या निकालात सर्वोच्च न्यायालय म्हणाले आहे की, १६ आदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर घेणार आहेत. तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदारांच्या अपात्रतेची निर्णय हा किमान रिजनेबल टाईम मध्ये द्यावा अश्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर देखील त्यांची प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले, आमदार अपात्रतेबाबत घाई करायची नाही व विलंबही करायचा नाही यात जो निर्णय होईल तो संविधानातील तरतुदी व न्यायालयाच्या निर्देशानुसारच घेतला जाईल. तर याबाबत आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रिजनेबल टाईममध्ये अपात्रतेचा निर्णय घ्यावा असे न्यायलयाने सांगितलं आहे. आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर जो निर्णय ठरवतील तो रिजनेबल टाईम आहे. रिजनेबल टाईम म्हणजे तो एक वर्षाचा आहे की तीन महिन्याचा घेतात याची सर्वोच्च न्यायालयच वाट पाहत आहे. न्यायालयाने दिलेल्या निकालास बगल देण्याचे काम केले आहे अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे.

तसेच जयंत पाटील पुढे म्हणाले आहेत की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्‍टोबर-नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्‍यता आहे. मात्र भाजप निवडणुका लांबवत जाण्याचे काम करीत असून त्यास राष्ट्रवादीला जबाबदार धरत आहे. प्रत्यक्षात, राष्ट्रवादी नव्हे, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळेच निवडणुकांना विलंब होत आहे,असंही जयंत पाटील म्हणाले. तसेच ते पुढे म्हणाले आहेत की, ‘विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आमचे जावई आहेत ते तसं करणार नाहीत, आमचा त्यांच्यावर विश्वास आहे, आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. ते लवकरात लवकर निकाल लावतील, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

हे ही वाचा : 

अजित पवार यांच्या विषयावर संजय शिरसाट यांनी शिंदे गटाची भूमिका मांडली

मुंबईत उघडलेल्या पहिल्या अॅपलच्या स्टोअरचे नाव Apple BKC

मुंबईच्या धर्तीवर ठाण्यातही उभारणार रोहिदास भवन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss