Karnataka च्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला उद्धव ठाकरे अनुपस्थितीत

कर्नाटकात काँग्रेस पक्षाचा बहुमताने विजय झाला आहे. त्यानंतर कर्नाटकाचा मुख्यमंत्री नक्की कोण होणार यावर पूर्ण आठवडाभर चर्चा ही करण्यात आली.

Karnataka च्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला उद्धव ठाकरे अनुपस्थितीत

कर्नाटकात काँग्रेस पक्षाचा बहुमताने विजय झाला आहे. त्यानंतर कर्नाटकाचा मुख्यमंत्री नक्की कोण होणार यावर पूर्ण आठवडाभर चर्चा ही करण्यात आली. त्याच बरोबर कर्नाटकाच्या मुख्यमंत्री पदी दोन्ही दावेदार हे योग्यच होते. त्यामुळे त्यांच्यात नक्की कोणत्या दावेदाराला मुख्यमंत्री बनवायचे हा पेच काँग्रेस पुढे उभा होता. आणि आज अखेर सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. परंतु या शपथविधी सोहळ्यास पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उपस्थित राहणार नाहीत. आणि आता त्यांच्या पाठोपाठ ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackarey) या शपथविधीला उपस्थित नाहीत.

आज सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांचा शपथविधी सोहळा पार पडला आहे. सिद्धरामय्या यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्रीपदाची शपत घेतली आहे तर डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील आहे. या शपथविधीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार देखील उपस्थित राहणार आहेत. परंतु या शपथविधीला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उपस्थित नाहीत. त्याच सोबत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackarey) या शपथविधीला उपस्थित नाहीत. तर ठाकरे गटाचे प्रतिनिधी म्हणून राज्यसभा खासदार अनिल देसाई आणि प्रियंका चतुर्वेदी उपस्थित आहेत.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील मित्रपक्ष म्हणून काँग्रेसकडून विरोधी पक्षातील दिग्गज नेत्यांना शपथविधीसाठी आमंत्रण देण्यात आलं आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी स्वत: उद्ध ठाकरे यांना फोन करुन निमंत्रण दिलं होतं. परंतु उद्धव ठाकरे शपथविधीला हजर राहणार नसल्याचं समजलं. त्यांच्या अनुपस्थितीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा बंगळूरच्या श्री कांतीराव स्टेडियमवर आयोजित करण्यात आला आहे. तसेच झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे देखील या शपथविधीसाठी उपस्थित आहेत काँग्रेसकडून दिग्गज नेत्यांची उपस्थिती या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. सोनिया गांधी, राहुल गांधी हे देखील या सोहळ्यासाठी कर्नाटकात असतील.

हे ही वाचा : 

सिद्धरामय्या यांच्या शपथविधी सोहळ्यात आमंत्रणासंबंधी संभ्रम

Thane मध्ये पुन्हा वाद!, शिवसेनेचे दोन गट एकमेकांसमोर भिडले?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version