Thursday, May 9, 2024

Latest Posts

बीडमध्ये मराठा ओबीसी लढत होण्याची शक्यता,पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या…

लोकसभा निवडणुकीचे वारे राज्यभरात वाहत आहेत.

लोकसभा निवडणुकीचे वारे राज्यभरात वाहत आहेत. सर्वच पक्षांकडून निवडणुकीची जोरदार तयारी केली जात आहे. माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना भाजपाने बीडमधून उमेदवारी दिली आहे. या जिह्ल्याचा त्या मोठ्या ताकदीने प्रचार करत आहेत. बीड जिल्ह्यासाठी महाविकास आघाडीचा उमेदवार (Maha Vikas Aghadi) अजूनही ठरलेला नाही. मात्र महाविकास आघडीकडून मराठा समाजातील उमेदवाराला तिकीट देण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. बीडमध्ये ओबीसी विरुद्ध मराठा (OBC Vs Maratha) अशी निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यावर आज पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली. तसेच त्यांनी आज पुण्यात जाऊन भाजपाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांची भेट घेतली.

पंकजा मुंडे म्हणाल्या, मी आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने बीडमध्ये जात आहे. रस्त्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवारांची मी भेट घेत आहे. त्याचाच भाग म्हणून मुरलीधर मोहोळ यांना शुभेच्छा देण्यासाठी मी पुण्यात आले आहे,असे पंकजा मुंडे म्हणाल्या. बीडमध्ये ओबीसी विरोधात मराठा अशी लढत पाहायला मिळणार आहे. बीड हा जिल्हा पुढारलेला आहे. बीडमधून वेगवेगळे खासदार निवडून आणले आहेत. मी २२ वर्षांपासून राजकारणात आहे. मी बीडची पालकमंत्री राहिलेली आहे. माझा प्रत्येक जाती-धर्माशी संबंध राहिलेला आहे. माझी कोणाशीही कटुता नाही. माझं सर्वसमावेशक धोरण राहिलेलं आहे. मी माझ्याविरोधातील उमेदवाराला फक्त प्रतिस्पर्धी म्हणून पाहते,असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

सध्या मी लोकसभेच्या उमेदवारांकडे लक्ष ठेवून आहे. लोकसभेची निवडणूक माझ्यासाठी काही नवीन नाही. २००४ सालापासून मी राजकारणात सक्रिय आहे. ही माझी पाचवी निवडणूक आहे. मी १७ वर्षांची असताना खासदार रजनीताईंबरोबर मी प्रचार केला होता, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटला नसल्याने येत्या काळात काय राजकीय घडामोडी घडणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

हे ही वाचा:

मुंगी कितीही लहान असली तरी हत्तीचा चव घेऊ शकते;पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी वसंत मोरे इच्छुक

सरकारमध्ये अनेक भ्रष्टाचारी लोक आहेत; मनोज जरांगेंचा सरकारवर आरोप

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss