संजय राऊतांवर हक्कभंग आणला जाऊ शकतो, अब्दुल सत्तार

राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार एकनाथ शिंदे यांनी बंड करून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार करावे लागले होते. त्यांनतर आता एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर उपमुख्यमंत्री पदाची देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली.

संजय राऊतांवर हक्कभंग आणला जाऊ शकतो, अब्दुल सत्तार

राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार एकनाथ शिंदे यांनी बंड करून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार करावे लागले होते. त्यांनतर आता एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर उपमुख्यमंत्री पदाची देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार आणि विरोधक महाविकास आघाडी यांच्यामध्ये चांगलीच खडाजंगी सुरु आहेत. शिंदे यांनी बंड केल्यानंतर खासदार संजय राऊत यांच्याकडून शिवसेनेवर (शिंदे-फडणवीस) जोरदार हल्लबोल केला जात आहे. त्यावरूनच शिवसेना आणि ठाकरे गट आता आमनेसामने आले आहेत.

संजय राऊत सतत शिवसेनेवर टीका करत आहेत त्यामुळे त्यांच्यावर हक्कभंग आणला जाऊ शकतो अशी शक्यता कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केली आहे आणि त्या सुधाताईंची पुढील कारवाई ही विधानसभेचे अध्यक्ष करतात असे सूचक विधान अब्दुल सत्तार यांनी केले आहे. आज पालघरमध्ये अब्दुल सत्तार बोलत होते तेव्हा ते म्हणाले की, खासदार संजय राऊत यांच्या विरोधामध्ये ५० आमदार हक्कभंग असल्याची चर्चाही सुरु आहे असे विधान अब्दुल सत्तार यांनी केले आहे.

आज अब्दुल सत्तार पालघर जिल्यामध्ये चिंचणी येथे शेतकरी मेळाव्यात आले असताना ते म्हणाले की, सरकार ही सकारात्मक असल्याचे मत राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी २५ पेक्षा अधिक उपाययोजना करणार असल्याचेही अब्दुल सत्तार यांनी यावेळी सांगितले. हे सरकार बळीराजाचं सरकार असून पालघरमध्ये मुंबई बडोदा द्रुतगती महामार्गाच्या ठिकाणी शेतकऱ्यांना मोबदला न देताच त्यांना बेघर केल्याच्या घटनेवरही सत्तार यांनी बोट ठेवलं आहे. याबाबतीत संपूर्ण माहिती घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल असे अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

हे ही वाचा : 

गौरी खानचं नवीन पुस्तक आलं वाचकांच्या भेटीस …. नवरा शाहरुख खानने केलं लाँच

प्रशांत दामले अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान

Khupte Tithe Gupte च्या पहिल्या भागात कोण येणार पाहिलं? EKNATH SHINDE की RAJ THACKERAY?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version