शिंदे-फडणवीस सरकारची सत्तासंघर्षाच्या निकालानंतर होणार पत्रकार परिषद

महाराष्ट्रामधील सत्तासंघर्षाचा निकाल आज लागला आहे आणि शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis government) मोठा दिलासा मिळाला आहे.

शिंदे-फडणवीस सरकारची सत्तासंघर्षाच्या निकालानंतर होणार पत्रकार परिषद

महाराष्ट्रामधील सत्तासंघर्षाचा निकाल आज लागला आहे आणि शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis government) मोठा दिलासा मिळाला आहे. ठाकरे गटाचा कोर्टामध्ये पराभव झाला आहे. उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) राजीनाम्यामुळे त्यांच्या विरोधामध्ये कोर्टाने निर्णय दिला आहे. या निकालाच्या आधीच अनेक नेत्यांनी त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्राने अनेक अंदाज वर्तवले जात होते. यावर राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सर्वाच्च न्यायालयाचा जो निकाल आला आहे त्या निकालामुळे आम्ही पूर्ण समाधानी आहोत.

आज दोन वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) पत्रकार परिषद घेणार आहेत या पत्रकार परिषदेला मी उपस्थित राहणार आहे असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले. कोर्टाच्या निकालावर अधिक विश्लेषण आम्ही पत्रकार परिषदे मध्ये देणार आहोत. जे लोक काल पर्यत उड्या मारत होते की आज सरकार जाणार त्यांच्या सगळ्या मन्सुबाह्यांवर पाणी फेरल गेलेलं आहे. ज्यांनी वेगवेगळा चर्चा केल्या त्या चर्चाही किती थूथांड होत्या हे पूर्णपणे समोर आलेले आहे. पुढील विश्लेषण आम्ही पत्रकार परिषदे मध्ये करू असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हे ही वाचा : 

सर्वात मोठी बातमी !, सत्तासंघर्षांचा निकाल काही तासांवर असताना Narhari Zirwal ‘नॉट रिचेबल’

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष Jayant Patil यांना ईडीची नोटीस

Maharashtra Political Crisis, आज ‘महाराष्ट्राचा सर्वोच्च निकाल’, १६ आमदारांच्या अपात्रतेचा होणार फैसला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version