Friday, May 10, 2024

Latest Posts

‘त्यांच्या’ हातात टीका करण्याशिवाय काही राहिलंच नाही, Shambhuraj Desai यांचा हल्लाबोल

राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराजे देसाई यांची मुंबईत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. आज दुपारनंतर आमची मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी भेट होईल, महायुतीत योग्य समन्वय आहे. जागावाटप एकत्र बसून समन्वय साधून जागावाटप केलं जाईल. त्यासाठी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार एकत्र बसतील. आमचे एकच उद्दिष्ट आहे की, ४५ प्लस उमेदवार निवडून आणायचे आहेत. शिवसेनेत एका ओळीत ठराव झालेला आहे, त्यामुळे जागा कुठली लढावी, कोणता उमेदवार असेल, ते सगळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठरवतील. सर्व नेत्यांनी मुख्य नेत्यांवर विश्वास ठेवून हा अधिकार त्यांना दिला आहे. त्यामुळे नेत्यांनी आणि मंत्र्यांनी सतत विचारणं योग्य नाही. पाच दिवस उमेदवारी अर्ज दाखल करायला खूप आहेत. आणखी बराच वेळ हातामध्ये आहे. चांगली चर्चा करून उमेदवार घोषित केले तर अडचण येणार नाही. उमेदवारी ठरवताना पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह म्हणजेच चांगलं विचारमंथन घेऊन विचार झाला तर तो फलदायी असेल. महायुतीत योग्य समन्वय आहे, सन्मानजनक जागावाटप केले जाईल, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराजे देसाई माध्यमांशी बोलताना दिली.

आम्ही विजय शिवतारे यांना भेटलो त्यांनी आधीच स्पष्ट सांगितले आहे की ते मुख्यमंत्र्यांना मानतात. त्यामुळे मी त्यांना एवढंच सांगितलं जर तुम्ही मुख्य नेत्याला मानत असाल तर तुम्हाला महायुतीचा धर्म पाळावा लागेल. पक्ष आदेशाच्या विरोधात जाऊन तुम्हाला कोणतीही भूमिका घेता येणार नाही. ते फक्त एवढेच म्हटले की मला थोडा वेळ द्या, मी म्हटलं आपल्याकडे वेळ कमी आहे. शिस्तभंगाची कारवाई हा जर-तरचा प्रश्न आहे. जिथे शिवसेनेचा उमेदवार असेल तिथे राष्ट्रवादी भाजपला मदत करावी लागेल. जिथे राष्ट्रवादीचा उमेदवार असेल तिथे भाजप शिवसेनेला मदत करावी लागेल आणि जिथे भाजपचा उमेदवार असेल तिथे शिवसेना राष्ट्रवादीला मदत करावी लागेल. हेच आमचं सूत्र आहे. काल पक्षाची बैठक एकनाथ शिंदे यांनी घेतली. त्यात नेते, मंत्री, मुख्य नेते, पदाधिकारी यांच्या सर्वांचीच बैठक तीन सत्रात ही विस्तृत बैठक घेतली होती. त्यात सांगितलं की, आपल्या सर्वांना महायुतीचा धर्म पाळावा लागणार आहे, असे शंभुराजे देसाई म्हणाले.

उद्धव ठाकरेंना टीका करण्याशिवाय हातात काही राहिलं नाही. तुमची अवस्था इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये काय झाली ते बघितलं. साडेचार मिनिटं फक्त बोलायला दिली. शिवसेनेच्या, बाळासाहेबांच्या काळात जो मान-सन्मान मिळायचा तो मिळाला का? याचं उत्तर द्यावं, असं म्हणत शंभुराजे देसाई यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र उगारले. यासोबतच, अभिनेता गोविंदा (Actor Govinda) याच्या उत्तर मुंबई मतदारसंघात निवडणूक लढवण्याबाबत विचारले असता, या चर्चा आपण लोक करत असतो. जर नरेंद्र मोदी यांना ४०० प्लसच्या बहुमताने तिसऱ्यांदा पंतप्रधानांच्या जागेवर विराजमान करायचं आहे. तर त्यासाठी ज्या-ज्या व्यक्ती नरेंद्र मोदी यांच्यासोबत येत असतील तर अशा सर्वांचे मी स्वागत करेन, असे मत शंभुराजे देसाई यांनी व्यक्त केले.

हे ही वाचा:

राज्य शासनाने माझ्याकडे महत्वपूर्ण शहराची जबाबदारी दिली – Civic Chief Saurabh Rao

ठाकरेंचा वारसा ‘ते’ सांगतील इतके आम्ही….काय म्हणाले Sanjay Raut?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss