शरद पवारांनी दिले प्रश्नाचे रोकठोक उत्तर

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता त्यांनतर नेते आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर त्यांनी तो निर्णय मागे घेतला.

शरद पवारांनी दिले प्रश्नाचे रोकठोक उत्तर

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता त्यांनतर नेते आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर त्यांनी तो निर्णय मागे घेतला. शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर एकाच राजकीय वादळ निर्माण झाले होते आणि पवारांच्या राजीमान्यावरून राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगल्या होत्या. शरद पवारांनी निर्णय मागे घेतल्यानंतर अनेक विरोधकांमध्ये आणि सामान्य लोकांच्या मनातही अनेक प्रश्न निर्माण होऊन संभ्रम निर्माण झाला. शरद पवार यांच्या राजीनाम्याचं खरं कारण काय? अजित पवार भाजपसोबत जाण्याच चर्चा का होते? सुप्रिया सुळे यांच्याकडे मोठी जबाबदारी मिळणार काय? असे प्रश्न सर्वसामान्याच्या मनामध्ये निर्माण झाले आहेत.

माझी सार्वजनिक जीवनाची सुरुवात १ मे १९६० पासून झाली आहे. मी १ मे १९६० रोजी युवक काँग्रेसचा सदस्य झालो. १९६७ साली विधानसभेमध्ये गेलो तेव्हापासून ते आतापर्यत विधानसभा, विधान परिषद, लोकसभा आणि राज्यसभा या चारही ठिकाणी मी ५६ वर्ष आहे. मी एकही दिवसाचा ब्रेक घेतला नाही या देशामध्ये सतत ५६ वर्ष संसदीय राजकारणामध्ये राहणारे खूप कमी लोक आहेत. अनेक मोठं मोठे नेता होऊन गेले वाजपेयी होऊन गेले. पण त्यांचा एकदा ग्वाल्हेरमध्ये पराभव झाला. कदाचित एक तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री करुणानिधी सोडले तर संसदीय राजकारणात सातत्याने राहणारे क्वचितच नेते या देशात होते त्यामधील मी त्यापैकी एक होतो.

मी विचार करत होतो की कधी तरी मी थांबलं पाहिजे नवीन पिढीला प्रोत्साहित केलं पाहिजे त्यांना आणखी प्रोत्साहित करावं असा माझा विचार होता पण माझ्याकडून एक कमतरता झाली. मी सहकार्यांना विश्वासात घेतले नाही. त्याच कारण म्हणजेच मला असं वाटत होत की, मी सहकाऱ्यांजवळ हा विषय काढला तर कुणी संमती देणार नाही. पण आपण निर्णय घेतला की ते सगळे एक दोन दिवस दु:खी होतील आणि त्यानंतर आपण त्यांची समजूत काढू शकतो. पण या पद्धतीची प्रतिक्रिया महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर अगदी आसामपासून केरळपर्यंत उमटल्या त्यामुळे मला निर्णय बदलावा लागला असे शरद पवार म्हणाले.

हे ही वाचा : 

युनेस्कोला बारसूमध्ये कातळ शिल्प सापडली

राज ठाकरेंनी केली मुंबई -गोवा महामार्गाची समृद्धी महामार्गासोबत तुलना

Raj Thackeray यांचा शरद पवरांवर निशाणा, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शरद पवार घेत नाहीत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version