अजित पवार का उपस्थित नव्हते शरद पवारांच्या पत्रकार परिषदेला?

राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी परवा दिलेल्या राजीनाम्याचा निर्णय मागे घेतला. त्यावेळी शरद पवारांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला अजित पवार (Ajit Pawar) हे उपस्थित नव्हते.

अजित पवार का उपस्थित नव्हते शरद पवारांच्या पत्रकार परिषदेला?

राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी परवा दिलेल्या राजीनाम्याचा निर्णय मागे घेतला. त्यावेळी शरद पवारांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला अजित पवार (Ajit Pawar) हे उपस्थित नव्हते. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये प्रचंड चर्चा रंगल्या होत्या. २ मे रोजी शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीचे प्रकाशन प्रकाशन झाले आणि त्या कार्यक्रमामध्ये शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केली. परंतु उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध केला.राज्यातील अनेक लोकांनी आंदोलने काढली आणि कार्यकर्ते आक्रमक झाले. कार्यकर्त्यांनी पवारांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी एकच गर्दी करून शरद पवारांवर दबाव आणला होता. शेवटी त्यांनी ५ मे रोजी निवृत्तीचा निर्णय मागे घेतला.

शरद पवार यांनी ज्या दिवशी निवृत्ती जाहीर केली त्या दिवशी अजित पवार उपस्थित नव्हते. आणि राजकारणामध्ये एकतर मागील काही दिवसांपासून अजित पवार भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा राजकारणात रंगल्या आहेत. त्या चर्चा अजित पवारांनी फेटाळून लावल्या आहेत परंतु त्यांच्याभोवती संशयाचं वारुळ उभं राहिले आहे. हेच शरद पवारांनी पत्रकार परिषदेमध्ये निवृत्ती मागे घेतली. त्या पत्रकार परिषदेला अजित पवार हे उपस्थित नव्हते. त्यामुळे या चर्चेला पेव फुटले होते. आज या बाबतीत अजित पवारांना विचारण्यात आले आणि ते म्हणाले की, राजीनाम्याचा विषय संपला असल्याने आम्ही कामाला सुरुवात केली आहे. पत्रकार परिषद झाली त्या दिवशी मी माझ्या नियोजित कार्यक्रमामुळे हजार राहू शकलो नाही असे ते म्हणाले. पुढे अजित पवार म्हणाले की, शरद पवारांच्या आदेशामुळे पत्रकार परिषदेला उपस्थित राहिलो नाही असे त्यांनी स्पष्ट केलं त्यामुळे पुन्हा एकदा राजकारणामध्ये चर्चा रंगल्या आहेत.

हे ही वाचा : 

युनेस्कोला बारसूमध्ये कातळ शिल्प सापडली

राज ठाकरेंनी केली मुंबई -गोवा महामार्गाची समृद्धी महामार्गासोबत तुलना

Raj Thackeray यांचा शरद पवरांवर निशाणा, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शरद पवार घेत नाहीत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version