Saturday, May 4, 2024

Latest Posts

दिनेश कार्तिक बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सामन्यात डेब्यूसाठी तयार, ट्विट करत स्वतःच दिली माहिती

त्याच वेळी, न्यूझीलंड संघ देखील बेंगळुरूमध्ये विशेष तयारीमध्ये व्यस्त आहे.दरम्यान, टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकचे नाव चर्चेत आले आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफी २०२३ ९ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना नागपुरात ९ ते १३ फेब्रुवारी दरम्यान खेळवला जाणार आहे. या हाय व्होल्टेज सीरिजपूर्वी टीम इंडियाने तयारी केली आहे. त्याच वेळी, न्यूझीलंड संघ देखील बेंगळुरूमध्ये विशेष तयारीमध्ये व्यस्त आहे.दरम्यान, टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकचे नाव चर्चेत आले आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये कार्तिकचाही प्रवेश झाला आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील या मालिकेत दिनेश कार्तिकचाही सहभाग असणार आहे. पण जर तुम्ही असा विचार करत असाल की क्रिकेटर म्हणून नाही तर कार्तिक या मालिकेत समालोचक म्हणून सामील झाला आहे. त्याची माहिती सोशल मीडियावर समोर आली आहे. स्वतः दिनेश कार्तिकने याबाबत एक ट्विट करून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी पदार्पणाची आठवण करून दिली. कार्तिकने नोव्हेंबर २००४ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध वानखेडे (मुंबई) येथे कसोटी पदार्पण केले होते. त्याच वेळी, त्याने भारतासाठी शेवटची कसोटी २०१८ मध्ये लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध खेळली होती.

दिनेश कार्तिकने भारतासाठी एकूण २६ कसोटी खेळल्या, ज्यात त्याने १०२५ धावा केल्या. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये एक शतक आणि सात अर्धशतकेही झळकावली आहेत. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी समालोचकांच्या यादीत त्याचे नाव समाविष्ट झाल्यानंतर दिनेश कार्तिकने आपल्या कसोटी पदार्पणाची आठवण करून ट्विट केले. कार्तिकने त्यात लिहिले की, त्याने भारतात ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पणही केले. हे पुन्हा एकदा होणार आहे. #Excited #INDvsAUS…

कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, शुबमन गिल, श्रेयस अय्यर (पहिल्या कसोटीतून बाहेर, केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल , रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव.

हे ही वाचा:

अंडर-१९ संघाचे भारतात आगमन, ढोल-ताश्यांच्या गजरात झाले जोरदार स्वागत

IND vs AUS Schedule 2023 न्यूझीलंडनंतर आता ऑस्ट्रेलियाची पाळी, ४ कसोटी मालिकेनंतर खेळली जाणार ३ वनडे मालिका, पहा संपूर्ण वेळापत्रक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss