Wednesday, May 15, 2024

Latest Posts

GTvsRR, कोण ठरणार वरचढ? गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स

इंडियन प्रीमियर लीग २०२३ चा (Indian Premier League 2023) ४८ व्या सामन्यांमध्ये गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (Gujarat Titans vs Rajasthan Royals) या दोन संघांमध्ये आजचा सामना रंगणार आहे.

इंडियन प्रीमियर लीग २०२३ चा (Indian Premier League 2023) ४८ व्या सामन्यांमध्ये गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (Gujarat Titans vs Rajasthan Royals) या दोन संघांमध्ये आजचा सामना रंगणार आहे. आज गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson) आज आमनेसामने असणार आहेत. आजचा हा सामना गतविजेता गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यामधील ही लढत राजस्थानच्या घरच्या मैदानावर पार पडणार आहे.

जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडिअमवर (Sawai Mansingh Indoor Stadium) हा सामना खेळवला जाणार आहे. संध्याकाळी ७.३० वाजता ही लढत पाहायला मिळणार आहे. या वर्षीच्या आयपीएलमध्ये दोन्ही संघ दमदार कामगिरी करत आहे त्यामुळे आजच्या सामन्यामध्ये कोण बाजी मारेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ गुणतालिकेमध्ये टॉप ४ मध्ये पाय रोखून आहेत. सध्या गुजरात संघ गुणतालिकेत (Scoreboards) अव्वल स्थानावर तर राजस्थान रॉयल्स चौथ्या क्रमांकावर आहे. दोन्ही संघाना मागील सामन्यामध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

गुजरात टायटन्स संघाला मागील सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून Delhi Capitals) पराभवाचा सामना करावा लागला होता. आज गुजरात आणि राजस्थान पराभवाचा बदला घेऊन विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करतील. इंडियन प्रीमियर लीगमध्ये राजस्थान आणि गुजरात हे दोन्ही संघ आतापर्यत ४ सामने खेळले आहेत. यामध्ये गुजरात टायटन्सचे पारडे जड आहे. गुजरात टायटन्सने चार पैकी तीन सामने जिंकले आहेत. राजस्थान रॉयल्सने फक्त एकाच सामना जिंकला आहे. दोन्ही संघाची सरासरी धावसंख्या १८० आहे.

राजस्थान रॉयल्स संघांची संभाव्य प्लेईंग ११ –

यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हिटमायर, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार आणि विकेटकीपर), डीसी जुरेल, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल, संदीप शर्मा.

गुजरात टायटन्स संघांची संभाव्य प्लेईंग ११ –

शुभमन गिल, हार्दिक पांड्या (कर्णधार), अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, विजय शंकर, राहुल तेवतिया, रिद्धिमान साहा (विकेटकीपर), राशिद खान, मोहम्मद शमी, मोहित शर्मा, नूर अहमद

हे ही वाचा : 

“राज ठाकरे यांनी जसे त्यांच्या काकांवर लक्ष ठेवले तसे मी माझ्या काकांवर लक्ष ठेवेल”, अजित पवारांचे प्रत्युत्तर

वरळीच्या पोद्दार आयुर्वेद महाविद्यालयात विद्यार्थ्याचा मृत्यू

मुंबईकरांनो घराबाहेर पडण्याचा विचारात असाल तर एकदा रेल्वेचे वेळापत्रक नक्की पहा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss