World Test Championship Final चा सामना ड्रॉ झाल्यास कोण होणार चॅम्पियन?

नुकताच इंडियन प्रीमियर लीग २०२३ चा फायनलचा सामना पार पडला. आता सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष हे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या सामान्याकडे लागले आहे. जागतिक कसोटी सामन्यासाठी आता मोजून ३ दिवस शिल्लक राहिले आहेत.

World Test Championship Final चा सामना ड्रॉ झाल्यास कोण होणार चॅम्पियन?

नुकताच इंडियन प्रीमियर लीग २०२३ चा फायनलचा सामना पार पडला. आता सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष हे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या सामान्याकडे लागले आहे. जागतिक कसोटी सामन्यासाठी आता मोजून ३ दिवस शिल्लक राहिले आहेत. आयपीएल २०२३ चा सिझन संपल्यानंतर लगेचच भारतीय खेळाडू सरावासाठी लंडनला रवाना झाले. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल सामने टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये कडवी झुंझ रंगणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी दोन्ही संघ जोरदार तयारी करत आहे. दोन्ही संघ नेट्समध्ये दररोज सरावही सुरु आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचे सामने लंडनच्या केनिंग्टन ओव्हल मैदानात हा सामना खेळवला जाणार आहे. सध्या भारताच्या संघाचे खेळाडूंचा लंडनमधील अरुंडेल कॅसल क्रिकेकट क्लबमध्ये सराव सुरु आहे. सरावाच्या माध्यमातून भारताचे खेळाडू वातावरणाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचा सामना पाच दिवस रंगणार आहे. हे सामने ७ जून ते ११ जून खेळण्यात येणार आहे. परंतु हा सामना जर ड्रॉ झाला तर या सामन्याचा निर्णय कसा करण्यात येईल असा प्रश्न नक्की क्रिकेट पाहणाऱ्यांना पडला असेल.

सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२१-२३ च्या गुणतालिकेमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ अव्वल स्थानावर आहे. जर सामना ड्रॉ झाला तर सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या संघाला जेतेपद मिळणार नाही. आयसीसीच्या नियमानुसार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना ड्रॉ झाला तर दोन्ही संघाना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे संयुक्त विजेते घोषित केले जाणार आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप Final साठी टीम इंडिया –
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.

राखीव खेळाडू | सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल आणि मुकेश कुमार

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप Final साठी टीम ऑस्ट्रेलिया –
पॅट कमिन्स (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.

हे ही वाचा:

Vat Pournima 2023: वटपौर्णिमेनिमित्त अशा पद्धतीने सजवा पूजेचे ताट

बीडमधून केली एका शेतकरी मुलाने गौतमीला लग्नाची मागणी

CSK vs GT, नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा धोनीचा निर्णय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version