Sunday, April 28, 2024

Latest Posts

बीडमधून केली एका शेतकरी मुलाने गौतमीला लग्नाची मागणी

प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील ही नेहमीच चर्चेत असते. ती कधी तिच्या वादामुळे चर्चेत असते तर कधी ती तिच्या खासगी जीवनामुळे ती चर्चेत असते.

प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील ही नेहमीच चर्चेत असते. ती कधी तिच्या वादामुळे चर्चेत असते तर कधी ती तिच्या खासगी जीवनामुळे ती चर्चेत असते. गौतमी पाटीलने तिच्या लग्नाबद्दलच्या अपेक्षा तिने मुलाखतीबद्दल सांगितल्या होत्या. त्यामुळे आता एका बीडच्या शेतकरी मुलाने गौतमीच्या सगळ्या अटी मान्य करत लग्नाची मागणी घातली आहे. त्याने त्याचा पत्रामध्ये घराचा पत्ता देखील लिहिला आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये गौतमी पाटीलची नाव चर्चेत असते आणि नेहमीच्या कृत्यावरून किंवा तिच्या विधानांवरून ती सर्वांचेच लक्ष वेधत असते. मागील एका मुलाखतीमध्ये तिने तिच्या लग्नाबद्दल सांगितले होते.

गौतमी एका मुलाखतीमध्ये म्हणाली होती की संसार थाटण्याचा विचार असून योग्य आणि समजून घेणारा जोडीदार तिला हवा आहे असे गौतमीने मुलाखतीमध्ये सांगितले होते. गौतमीला मागणी थेट बीड जिल्ह्यामधील केज तालुक्यातील चिंचोलीमाळी येथील रोहन गलांडे पाटील या तरुणाने घातली आहे. पत्रामध्ये त्याने लिहिले आहे की, तुझ्या इच्छा-अटी सगळ्या मान्य, बोल तू होती का माझी परी? असे त्याने पत्रामध्ये लिहिले आहे.

पुढे त्याने पत्रामध्ये लिहिले आहे की, तू जशी आहेस तशी मला आवडली आहेत. जर तुझ्यासोबत कोणी लग्न करत नसेल तर मी माणुसकीच्या नात्याने मी तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे. मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे दूध, शेती सगळी संपत्ती आहे. तुझी जर तयारी असेल तर तू भेटायला ये असे त्या पत्रामध्ये रोहन गलांडे पाटील याने लिहिले आहे.

हे ही वाचा:

Vat Pournima 2023: वटपौर्णिमेनिमित्त अशा पद्धतीने सजवा पूजेचे ताट

“आदिपुरुष” चित्रपटातील गाणे झाले रिलीज, प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद

CSK vs GT, नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा धोनीचा निर्णय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss