Saturday, May 4, 2024

Latest Posts

IND vs NZ 3rd T20 तिसऱ्या आणि निर्णायक साम्यासाठी भारत आणि न्यूझीलंड आमने- सामने, टॉस जिंकत भारताने घेतला फलंदाजीचा निर्णय

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन टी-२० मालिकेतील तिसरा सामना खेळला जात आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हार्दिकने संघात एक बदल केला आहे. त्याने युजवेंद्र चहलच्या जागी उमरान मलिकचा संघात समावेश केला आहे. न्यूझीलंडनेही बदल केला आहे. कॅप्टन मिचेल सँटनरने सांगितले की, जेकब डफीच्या जागी बेन लिस्टरला प्लेइंग-११ मध्ये ठेवण्यात आले आहे.

न्यूझीलंडविरुद्ध भारताचा डाव सुरू झाला आहे. या सामन्याच्या सुरुवातीला इशान किशनसह शुभमन गिल डावाची सलामी देण्यासाठी आला आहे. तर न्यूझीलंड संघाकडून बेन लिस्टरने गोलंदाजीची सुरुवात केली. रांचीमध्ये खेळवण्यात आलेला पहिला सामना न्यूझीलंडने जिंकला होता. त्याचवेळी टीम इंडियाने लखनौमध्ये खेळवण्यात आलेला दुसरा टी-२० जिंकला. त्यामुळे आजचा सामना हा दोन्ही संघांसाठी तेवढाच महत्त्वाचा असणार. तसेच भारताला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावाच लागेल कारण, भारतीय संघ स्वतःच्याच मायभूमीत हा सामना हरू इच्छित नाही.

१९ वर्षांखालील महिला संघाचा अहमदाबादमध्ये सत्कार करण्यात आला. १९ वर्षांखालील महिला संघाने दक्षिण आफ्रिकेत इंग्लंडचा पराभव करून टी-२० विश्वचषकावर कब्जा केला होता. या सत्कार समारंभात भारतरत्न आणि महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्याशिवाय बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी, सचिव जय शाह आणि इतर अधिकारी उपस्थित होते. बीसीसीआयने १९ वर्षांखालील महिला संघाला ५ कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले होते.

दोन्ही संघांचे प्लेयिंग-११

भारत : शुभमन गिल, ईशान किशन (यष्टीरक्षक), राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम मावी, कुलदीप यादव, उमरान मलिक, अर्शदीप सिंग.

न्यूझीलंड: फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे (wk), मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, डॅरेल मिशेल, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर (क), ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन, बेन लिस्टर, ब्लेअर टिकनर.

हे ही वाचा:

Union Budget, डिजिलॉकरमध्ये होणार वाढ; ओळखपत्र, पत्ता आणि अनेक इतर गोष्टी करू शकणार अपडेट

महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी या बजेटने काय दिले असा प्रश्न राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी व उपमुख्यमंत्र्यांनी केंद्राला विचारावा…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss