Saturday, May 18, 2024

Latest Posts

Union Budget, डिजिलॉकरमध्ये होणार वाढ; ओळखपत्र, पत्ता आणि अनेक इतर गोष्टी करू शकणार अपडेट

आज केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर कला. यामध्ये अनेक घोषणा करण्यात आलया. यामध्ये डिजिलॉकरचा (DigiLocker) देखील समावेश केला गेला होता. तसेच आजच्या अर्थसंकल्पात डिजिलॉकर संबंधित एक महत्त्वाची घोषणा देखील केली गेली. डिजिलॉकर हे आता देशातील नागरिकांसाठी मुख्य KYC प्रणाली करता ‘वन-स्टॉप सोल्युशन’ ठरू शकणार आहे.त्याच बरोबर नागरिक आपल्या संबंधित डॉक्युमेंटमध्ये हवे ते बदल करू शकणार आहेत.

आज केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळेस निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या भाषणात डिजिलॉकर विषयक मोठी घोषणा केली आहे. यावेळेस निर्मला सीतारामन यांनी डिजिलॉकर संदर्भात बोलताना सांगितलं की “केवायसी आवश्यकता पूर्ण करण्यासाठी डिजिलॉकर आणि आधारचा वापर वन-स्टॉप सोल्युशन म्हणून केला जाईल. यासोबतच डिजिलॉकरसाठी वन स्टॉप केवायसी व्यवस्थापन प्रणाली तयार केली जाईल. त्यासाठी पॅनकार्डचा अधिकृत ओळखपत्र म्हणून वापर करता येणार आहे” असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले आहे. निर्मला सीतारामन यांनी या संदर्भात पुढे सांगितलं की, “डिजिलॉकर आता व्यक्तींसाठी वन-स्टॉप केवायसी देखभाल प्रणाली असेल, त्यामुळे तुम्हाला कागदपत्रांमध्ये बदल करता येतील आणि ते तुमच्या डिजिलॉकरशी लिंक केलेल्या सर्व दस्तऐवजांमध्ये दिसून येतील. डिजिलॉकर सेवा आणि आधार यांचा ओळखपत्र म्हणून वापर केला जाणार आहे. विविध सरकारी एजन्सी, नियामक आणि नियमन केलेल्या संस्थांद्वारे देखरेख केलेल्या व्यक्तींची ओळख आणि पत्ते जुळण्यासाठी आणि अपडेट करण्यासाठी वन-स्टॉप सोल्यूशन सेट केलं जाईल”. असे देखील केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले आहे.

डिजिलॉकर हा एक अँप असून हे आपल्याला ऑनलाईन सुविधा पुरवते वापरकर्ते यामध्ये सर्व दस्तावेज सेव्ह करून ठेवू शकतात ज्यामुळे वापरकर्त्यांना दस्तावेजांची हार्डकॉपी बाळगण्याची गरज भासणार नाही. आणि अँपवर असलेले दस्तावेज हे अधिकृत मानले जातील. आणि याला सरकारने मान्यता दिली आहे. या अॅपमध्ये वापरकर्ते आधारपासून ड्रायव्हिंग लायसन्स आणि मार्कशीटपर्यंत सर्व कागदपत्रं सेव्ह करु शकतो. हे डिजिटल दस्तऐवज भारतीय माहिती तंत्रज्ञान कायदा २००० अंतर्गत कायदेशीररित्या वैध दस्तऐवज म्हणून धरले जातील.

हे ही वाचा:

Budget 2023, “तू समझ के अपुन को सिखा देना” सोशल मिडीयावर बजेट संदर्भात मिम्सचा होतोय पाऊस

गौतम अदानी मागे टाकत मुकेश अंबानी बनले भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, येथे जाणून घ्या संपूर्ण यादी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss