KKRvsPBKS, पुन्हा एकदा चांगली खेळी खेळूनही शिखर धवनच्या संघाचा पराभव

काल आयपीएल २०२३ (IPL 2023) मध्ये पार पडलेला सामना कोलकत्ता नाईट रायडर्स Kolkata Knight Riders) विरुद्ध पंजाब किंग्स (Punjab Kings) यामध्ये कोलकाता नाईट रायडर्सने बाजी मारली.

KKRvsPBKS, पुन्हा एकदा चांगली खेळी खेळूनही शिखर धवनच्या संघाचा पराभव

काल आयपीएल २०२३ (IPL 2023) मध्ये पार पडलेला सामना कोलकत्ता नाईट रायडर्स Kolkata Knight Riders) विरुद्ध पंजाब किंग्स (Punjab Kings) यामध्ये कोलकाता नाईट रायडर्सने बाजी मारली. कोलकाता नाईट रायडर्सचा फलंदाज रिंकू सिहने (Rinku Singh) पंजाब किंग्स कडून विजय हिसकावून घेतला. कोलकाता नाईट रायडर्सने पंजाब किंग्स पाच विकेट पराभव करून प्ले ऑफच्या आशा अजूनही जिवंत ठेवल्या आहेत. या सामनामध्ये प्रथम फलंदाजी करत पंजाब किंग्सने १७९ गाठली होती. कोलकत्ता नाईट रायडर्सच्या संघाने पाच गडी राखून ही संख्या सहजपणे गाठली.

गुणतालिकेमध्ये सध्या चांगलीच लढत सुरू आहे कोण प्लेऑफ मध्ये जाणार याचा अंदाज अजूनही लावता येत नाही. परंतु या विजयासह कोलकत्ता नाईट रायडर्सचा संघ ११ सामन्यामधून दहा गुणांसह गुणतालिकेमध्ये पाचव्या स्थानावर आला आहे. तर पंजाब किंग्स संघ अकरा सामने खेळून दहा गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे. कोलकत्ता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स या सामन्यांमध्ये पंजाब किंग्सचा कर्णधार शिखर धवनने (Shikhar Dhawan) सर्वाधिक ५७ धावा केल्या. त्याचबरोबर कोलकत्ता नाईट रायडर्सचे गोलंदाज वरून चक्रवर्ती तीन विकेट्स आणि हर्षित राणाने दोन विकेट्स घेतल्या.

कोलकत्ता नाईट रायडर्सचा कर्णधार नितिश राणाने ५१ धावा केल्या तर आंद्रे रसेल ने ४२ धावा केल्या. कर्णधार शिखर धवनच्या जोरावर पंजाब किंग्स धावसंख्या तर मोठी करू शकला. परंतु त्याला बाकीच्या फलंदाजांची साथ मिळाली नाही. भानुका राजपक्षे याला सुद्धा खाते उघडता आले नाही. कोलकत्ता नाईट रायडर्स फिरकी गोलंदाजांनी उत्तम कामगिरी केली. या विजयानंतर कोणत्या संघाची प्लेऑफ मध्ये जाण्याची संधी थांबेल हे पाहणे फार महत्त्वाचे ठरेल.

हे ही वाचा : 

युनेस्कोला बारसूमध्ये कातळ शिल्प सापडली

राज ठाकरेंनी केली मुंबई -गोवा महामार्गाची समृद्धी महामार्गासोबत तुलना

Raj Thackeray यांचा शरद पवरांवर निशाणा, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शरद पवार घेत नाहीत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version