Friday, May 17, 2024

Latest Posts

Ayodhya Ram Mandir Inauguration, Govind dev Giri Maharaj LIVE : पंतप्रधानांनी ३० दिवसांआधी नियमावली ही मागवली

गोविंद देव गिरी महाराज म्हणाले आहेत. ही देशाच्या आत्मविश्वासाची प्राणप्रप्रतिष्ठा आहे. ५०० वर्षानंतर प्रभू श्री राममंदिरात आले आहेत.

अखेर ५०० वर्षाच्या तपश्चर्येनंतर आज अयोध्येत प्रभू श्री रामांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. पवित्र मंत्रोच्चाराचा ध्वनी… शंखनाद आणि जय श्रीरामच्या घोषात आज प्रभू श्रीरामाचं अयोध्या नगरीत आगमन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विधीवत पूजा अर्चा करून श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. अखेर राम मंदिरात आज प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडला आहे. आणि प्रभू रामचंद्राचं तेजस्वी रुप पाहून डोळ्यांचं पारण फिटतंय. रामललाला सोन्याच्या दागिन्यांनी मढवण्यात आलं आहे. तसेच, त्याच्या हातात सोन्याचा धनुष्यबाण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत आणि अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत रामलला प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

यांनतर अयोध्या येथे उपस्थित असलेल्या सर्व भक्तांना संबोधित केले आहे. यावेळी गोविंद देव गिरी महाराज यांनी सर्व भक्तांना संबोधित केले आहे. आणि यावेळी बोलत असताना गोविंद देव गिरी म्हणाले आहेत की, हे केवळ फक्त देशाचे नाही तर संपूर्ण विश्वाचे भाग्य आहे की आपल्याला असे नेते मिळाले. पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या मंगल हातानी आज प्रतिष्ठपणा केली आहे. आजचा सोहळा देशाच्या आत्मसन्मानाची प्राणप्रतिष्ठपणा आहे असं गोविंद देव गिरी महाराज म्हणाले आहेत. ही देशाच्या आत्मविश्वासाची प्राणप्रप्रतिष्ठा आहे. ५०० वर्षानंतर प्रभू श्री राममंदिरात आले आहेत.

तर आपलूं पंतप्रधानांनी ३० दिवसांआधी नियमावली ही मागवली होती असं देखील गोविंद देव गिरी महाराज म्हणाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उपवास सोडला. त्यांनी ११ दिवस अन्यत्याग केला होता. त्यांनी अन्न आणि पाण्याचा त्याग केला. महाभारतानुसार उपवास हे सर्वात मोठे तप आहे. हे तप करणारा नरेंद्र मोदी यांच्यासारखा तपस्वी राष्ट्रीय नेता मिळणे सोपे नाही. आम्ही त्यांना या दिवसांत विदेश प्रवास करण्याचे नाही म्हटले होते. त्यामुळे त्यांनी विदेश प्रवासही टाळला. परंतु देशाचा तिर्थस्थळांचा प्रवास केला. हा प्रवास नाशिकपासून सुरु केला. त्यानंतर रामेश्वरम गेले. देशातील तिर्थस्थळांवर असणाऱ्या दिव्य आत्मांना बोलवून अयोध्यात या सोहळ्यासाठी आणले. आम्ही मोदी यांना तीन दिवस भूमी शयन करण्याचे सांगितले. परंतु त्यांनी अकरा दिवस भूमीशयन केले.

गोविंददेव गिरी महाराज यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राजर्षी उपाधी दिली. गोविंददेव गिरी महाराज म्हणाले की, मंदिरात फक्त एका मूर्तीची प्रतिष्ठा झाली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नामुळे रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा होऊ शकली. पंतप्रधानांनी रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठासाठी सर्व नियमांचं पालन केले. देशातील अनेक मंदिरांना नरेंद्र मोदी यांनी भेट दिली.  मला आता या परंपरेला बघून एकच राजा लक्षात येतात ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. गोविंदगिरी महाराज यांनी शिवाजी महाराज यांच्या तपाची आठवण करुन दिली. शिवाजी महाराज यांनी सर्व धार्मिक परंपरा पूर्ण केल्या होत्या. शिवाजी महाराज एकदा श्रीशैलम येथे गेले होते. तेव्हा त्यांनी तीन दिवस उपवास केला होता. त्यावेळी शिवाजी महाराज संन्यास घेण्याचे म्हणत होते. परंतु त्यांच्या सर्व मंत्र्यांनी त्यांना परत आणले. तसेच नरेंद्र मोदी यांना भगवती देवीने हिमालयातून पाठवले. त्यांना देशसेवेचे कार्य दिले. आपणास असा श्रीमंत योगी मिळाला आहे, असे गोविंदगिरी महाराज यांनी सांगितले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चरणाअमृत देऊन हजारो जणांसमोर त्यांचा उपवास सोडला.

हे ही वाचा:

‘या दिवसाला सुवर्णदिन’…राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठे दरम्यान प्राजक्ता माळीची भावनिक पोस्ट

प्राणप्रतिष्ठापनेनंतर श्रीराम यांच्या मूर्तीची पहिली झलक आली समोर; रामचंद्राचं तेजस्वी रुप पाहून डोळ्यांचं पारण…

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी बनवा खास तांदळाची खीर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss