Friday, May 17, 2024

Latest Posts

बिहार मधील डॉक्टर चे जबरदस्ती लावले लग्न

हा भयंकर प्रकार बिहार मधील बेगूसरायामध्ये घडला आहे.

बिहारमध्ये अनेकदा मुलं मुलींशी जबरदस्ती लग्न करण्याचे अनेक किस्से समोर येतात. तर आता बिहार मध्ये आगळा वेगळा प्रकार घडला आहे. गुरांच्या डॉक्टराचे जबरदस्ती लग्न लावण्यात आले आहे. हा भयंकर प्रकार बिहार मधील बेगूसरायामध्ये घडला आहे. सत्यम झा असं या डॉक्टरचं नाव असून तेघरा तालुक्यातील पीदौली या गावात तो त्याच्या कुटुंबासोबत राहतो.
सोमवारी सायंकाळी त्याला गुरांना तपासणीसाठी फोन आला असं सांगून तो घराबाहेर निघाला. सत्यम मोरटार गावातील एका घरात गुरांना बघायला गेला त्यावेळी त्या घरातल्या व्यक्तींनी त्यांच्या घरातल्या मुली सोबत त्याचे जबरदस्तीने लग्न लावून दिले.
पोलिसांच्या माहितीनुसार सत्यम हा सतत त्या गावात गुरांना तपासायला यायचा आणि त्याच गावातल्या मुलीसोबत त्याचे प्रेमसंबंध देखील होते. सोमवारी त्याला गावात बोलवण्यात आले आणि त्याचे लग्न लावून दिले. आता हे लग्न त्याच्या मर्जीने लावले की बळजबरीने हे चौकशी केल्यानंतर कळेल असं मत पोलिसांनी मांडले.

Latest Posts

Don't Miss