Friday, May 17, 2024

Latest Posts

तिघांचा समुद्रात बुडून मृत्यू; नागरिकांमध्ये भीती चे वातावरण

नागरिकांमध्ये भीती चे वातावरण आहे. नागरिकांना कुठल्याही ठिकाणी फिरायला गेल्यावर सावध राहण्याचे आवाहन केले गेले आहे. 

पावसाळा सुरू झाला की अनेकजण मजा – मस्ती करायला समुद्राजवळ किंवा धबधब्याच्या ठिकाणी फिरायला जात असतात. मात्र काही वेळा पाण्याचा अंदाज न येता मजा मस्ती जीवाशी येते. अशीच एक घटना जुहू चौपाटीवर येथे घडली आहे.
जुहू चौपाटीवर चार मुले फिरायला आली होती. दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास मुले पाण्यात पोहायला गेली. मात्र भरतीचा अंदाज न आल्यामुळे ते चोघेही बुडाले. समुद्राजवळ असणाऱ्या लाइफगार्ड ला चार मुलांपैकी एका मुलाला वाचवण्यात यश आले आहे. मात्र तिघेही जण समुद्रात बुडाले आहे. अमन सिंग वय २१,  कौस्तुभ गुप्ता १८, प्रथम गुप्ता १६ अशी बुडालेल्या तिघांची नावे आहेत.
कुटुंबातील सदस्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार या मुलांचा शोध लागला नसुन तिघांचा शोध अग्निशमक दल आणि नौदलाचे पथक घेत आहेत. अशी माहिती अग्निशमक दल प्रमुख हेमंत परब यांनी दिली आहे. या घटनेनंतर अनेक पर्यटकांना तिथे जाण्यास सक्त मनाई केली आहे. असून तेथे पोलिसांचा कडक पहारा आहे. नागरिकांमध्ये भीती चे वातावरण आहे. नागरिकांना कुठल्याही ठिकाणी फिरायला गेल्यावर सावध राहण्याचे आवाहन केले गेले आहे.

Latest Posts

Don't Miss