Sunday, May 19, 2024

Latest Posts

मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते भारत-पाकिस्तान सीमेवर शिवरायांच्या भव्य पुतळ्याचे होणार अनावरण

मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते भारत-पाकिस्तान सीमेवर शिवरायांच्या भव्य पुतळ्याचे होणार अनावरण

जम्मू काश्मिरमधील कुपवाड्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारुढ पुतळा उभारला जाणार आहे. याच पुतळ्याचं अनावरण आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार असून; यावेळी जवानांसोबत मुख्यमंत्री दिवाळी फराळाचा आनंदही घेणार आहेत.छत्रपती शिवाजी महाराजांच्या या अश्वारूढ पुतळ्याचं पूजन महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत २० ऑक्टोबर रोजी राजभवन येथे झाला होता. त्यानंतर महाराजांचा हा पुतळा कुपवाडाच्या दिशेनं रवाना झाला होता.

कुपवाडा येथील भारतीय सैन्याच्या छावणीत उभारण्यात येणारा शिवरायांचा हा अश्वारूढ पुतळा साडेदहा फुट उंचीचा असून तो जमिनीपासून जवळपास तितक्याच उंचीच्या आणि ७ x ३ या आकाराच्या चौथऱ्यावर उभारण्यात आलेला आहे. ‘आम्ही पुणेकर’ या संस्थेच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जम्मू काश्मिरमधील कुपवाडा येथे आला आहे. भारतीय सैन्याच्या छावणीत या पुतळ्याच्या स्थानाचं भूमीपूजन भारतीय सेनेच्या ‘राष्ट्रीय रायफल्स’ च्या ४१ व्या बटालियनचे (मराठा लाईट इन्फ्रंटरी) कमांडिंग ऑफीसर(commanding officer) कर्नल नवलगट्टी आणि छत्रपती शिवाजी स्मारक समितीचे अध्यक्ष अभयराज शिरोळे यांच्या हस्ते २० मार्च २०२३ रोजी पार पडले होते. सकाळी दहाच्या सुमारास या पुतळ्याचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असून, यावेळी जम्मू -काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा, महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार हे प्रमुख पाहुणे यादरम्यान उपस्थित राहणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बॉर्डर टुरिझमची ( Border Tourism) संकल्पना मांडली होती. या योजनेअंतर्गत शिवाजी महाराजांचा पुतळा भारत-पाकिस्तान सीमेवर स्थापीत करण्यात येणार आहे. भारत-पाकिस्तान सीमेवर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाचा क्षण आहे. यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्ष पूर्ण झाली, याच वर्षात छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिकृती भारत-पाकिस्तानच्या सीमेवर स्थापित होत आहे.

हे ही वाचा : 

रोहित शर्माची जबराट आयडिया, ज्याचा विराट कोहलीलाही झाला फायदा!

मुंबईतील वाढत्या प्रदूषणावर हायकोर्ट आक्रमक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss