Saturday, May 18, 2024

Latest Posts

“तू मला मैदानात जे सांगितलं त्याचं मी नेहमी उलटच करत आलो” उलटा होऊन वीरेंद्र सेहवागच्या सचिनला शुभेच्छा

Sachin Tendulkar 50th Birthday : क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या भारतरत्न सचिन तेंडुलकर याचा आज पन्नासावा वाढदिवस साजरा होतोय.१६ व्या वर्षात भारतीय क्रिकेट संघात पदार्पण केलेल्या सचिन तेंडुलकर याने आपल्या अभूतपूर्व खेळीने अनेक दशक चाहत्यांच्या मनात सर्वोच्च स्थान बनवलं आहे.

Sachin Tendulkar 50th Birthday : क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या भारतरत्न सचिन तेंडुलकर याचा आज पन्नासावा वाढदिवस साजरा होतोय.१६ व्या वर्षात भारतीय क्रिकेट संघात पदार्पण केलेल्या सचिन तेंडुलकर याने आपल्या अभूतपूर्व खेळीने अनेक दशक चाहत्यांच्या मनात सर्वोच्च स्थान बनवलं आहे. आजत्यागत सचिनचा चाहता वर्ग काही कमी झालेला नाही. सचिन देशासाठी खेळत असताना जेवढं प्रेम त्याचे चाहते त्याच्यावर करायचे तेवढंच प्रेम आजही त्याचे चाहते त्याच्यावर करत आहेत. आज ५० सावा वाढदिवस मास्टर ब्लास्टर आपल्या कुटुंबासोबत गोवा येथे साजरा करणार आहे. सचिनची पत्नी अंजली तेंडुलकर व मुलगी सारा तेंडुलकर गोव्यात पोहचले असून कडेकोट बंदोबस्तात सचिनही गोव्याला पोहचला आहे.

देशभरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर सचिन तेंडुलकर याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. सचिनचा चाहता वर्ग ५० व्या वाढदिवसानिमित्त सचिनवर शुभेच्छांचा वर्षाव करताना पाहायला मिळत आहे. अशातच सचिनचा एकेकाळीचा जवळचा सहकारी वीरेंद्र सेहवाग याने सगळ्या वेगळ्या पद्धतीने सचिनला शुभेच्छा दिल्या आहेत. वीरू आणि सचिनची जोडी अतिशय लोकप्रिय होती. अशातच आपल्या जवळच्या सहकाऱ्याला वीरेंद्र सेहवाग याने खास शुभेच्छा दिल्या आहेत.

वीरेंद्र सेहवाग सचिनच्या वाढदिवसानिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये वीरेंद्र सहवाग चक्क उलटा होतं शिर्षासन अवस्थेत सचिन वाढदिवसाच्या शुभेच्छा देतोय. त्या पोस्टमध्ये वीरेंद्र सेहवागकडून लिहिण्यात आलेलं कॅप्शनही खास आहे. यात सेहवागने “तू मला मैदानात जे काही सांगितलंस, मी त्याचं नेहमी उलटच करत आलो आहे, त्यामुळे तुझ्या ५० साव्या वाढदिवसाला तुला शिर्षासन करूनच शुभेच्छा देतोय, पाची आप जिओ हजारो साल साल… याने असं लिहिला आहे. त्यामुळे ही पोस्ट सध्या चांगलीचं चर्चेत आली आहे.

Latest Posts

Don't Miss