भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बनले जगामधील सर्वाधिक लोकप्रिय नेते

जपानमध्ये (Japan) सुरु असलेल्या G-७ परिषदेमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यावेळी सर्वाधिक लोकप्रिय नेते आहेत. नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता ७८ टक्के इतकी आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बनले जगामधील सर्वाधिक लोकप्रिय नेते

जपानमध्ये (Japan) सुरु असलेल्या G-७ परिषदेमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यावेळी सर्वाधिक लोकप्रिय नेते आहेत. नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता ७८ टक्के इतकी आहे. असे सांगण्यात येते की २२ देशांपैकी फक्त चार देशांच्या नेत्यांना ५० टक्क्यांपेक्षा जास्त लोकप्रियता मिळाली आहे. या यादीमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), मेक्सिकोचे अध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर (Andres Manuel Lopez Obrador), स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष एलेन बेर्सेट (Ellen Bersett) आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज (Anthony Albanese) या नेत्यांचा समावेश आहे. काही दिवसांआधी अमेरिकेच्या फर्म मॉर्निंग कन्सल्टने २२ देशामध्ये एक सर्वे केला यावेळी G-७ परिषदेमध्ये लोकप्रिय नसलेल्या नेत्यांची संख्या अधिक आहे असे या सर्वेक्षणातून समजले.

सर्वेक्षणातून असे समोर आले की अमेरिका (America), जपान (Japan), फ्रान्स (France), ब्रिटन (Britain) या देशांच्या राष्ट्रप्रमुखांना आपापल्या देशामधील जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याने त्यांची लोकप्रियता कमी झाली आहे असा दावा करण्यात आला आहे. असे सांगण्यात येत आहे की जर आता निवडणूक झाल्या तर ब्रिटनमध्ये कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे ऋषी सुनक (Rishi Sunak) हे मजूर पक्षाकडून पराभूत होतील. त्याचबरोबर ट्रूडोच्या लिबरल पक्षाचा कॅनडात कंझर्व्हेटिव्ह पक्षाकडून पराभव होईल. असा अंदाज लावला जात आहे. स्कोल्झ यांच्या पक्षाचाही पराभव होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हे ही वाचा:

IPL2023, कोणता संघ प्लेऑफचे चौथे स्थान मिळणार?

Aluminium Foil Paper वापरणे टाळा, उद्भवू शकतो आरोग्यावर मोठा परिणाम!

वर्षा निवासस्थानी जाऊन भगतसिंह कोश्यारींनी घेतली एकनाथ शिंदेची भेट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version