Thursday, May 16, 2024

Latest Posts

मोदी सरकारचा मोठा निर्णय; मोदी सरकारकडून पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारकरडून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यात आला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारकरडून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यात आला आहे. मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात (Petrol price Diesesl price) केली आहे. या कपातीमुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात २ रुपयांनी घसरण झाली झाली आहे. हे नवीन लागू करण्यात आलेले दर आजपासून लागू होणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी एक्सद्वारे ही माहिती दिली आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. येत्या काही काळात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यातच आज मोदी सरकारने दिलेल्या महत्वपूर्ण निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकारकडून आज संपूर्ण देशभरात पेट्रोल आणि डिझेलचा दरात दोन रुपयांची कपात करण्यात आली आहे. सकाळी ६ वाजल्यापासून हे नवीन दर लागू करण्यात आले आहेत. पेट्रोलचा नवीन भाव १०४.१५ प्रति लीटर तर डिझेलचा भाव ९२.१० प्रति लीटर असा आहे.

पेट्रोलचे दर

मुंबई -१०४.२
कोलकाता – १०३.९४
चेन्नई -१००.७५
नवी दिल्ली -९४.७२

डिझेलचे दर

मुंबई – ९२.१५
कोलकाता – ९०.७६
चेन्नई -९२.३४
नवी दिल्ली – ८३.६२

हे ही वाचा:

ममता बॅनर्जींच्या डोक्याला गंभीर दुखापत, उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज

उन्हाळ्यात लूक क्लासी ठेवायचा तर कोणत्या कपडे आणि  रंग तुमच्या वॉर्डरोबमध्ये असावेत जाणुन घ्या

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss